वर्णमाला

  • स्वर : मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूळ ध्वनींना स्वर असे म्हणतात.

ऱ्हस्व स्वर : ज्या स्वराचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्यास –  ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. उदा: अ, इ, उ, ऋ, लृ

दीर्घस्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो, त्यास  दीर्घस्वर असे म्हणतात. उदा : ‘आ, ई, ऊ’

संयुक्त स्वर :दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. उदा : ए, ऐ, ओ, औ. सजातीय स्वर व विजातीय स्वर  : अ-आ, इ-ई, उ-ऊ

व्यंजने

व्यंजणाचे प्रकार

  • स्पर्श व्यंजन : ज्या व्यंजनाचा उच्चार करताना जीभ, कंठ, दात, तालू, ओठ, यांच्याशी त्याचा स्पर्श होऊन हे वर्ण उच्चारले जातात. म्हणून त्यांना स्पर्श व्यंजन असे म्हणतात.
  • अनुनासिके : ज्या वर्णांच्या उच्चाराबरोबर त्यांचा उच्चार नाकातून होतो म्हणून त्यांना अनुनासिक असे म्हणतात.

        उदा: ङ, ञ, ण, न, म

  • कठोर : ज्या व्यंजनाच्या उच्चारामध्ये तीव्रता दिसते त्यास कठोर व्यंजने म्हणतात.

       उदा: क्, खू, च्, छ्, ट्, ठ्, तू, थ्, प्, फ्,

  • मृदु वर्ण:- ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात किंवा ज्या व्यंजनांचा उच्चार हळुवार असतो किंवा नाजूक असतो त्यांना मृदु वर्ण म्हणतात. उदाहरणार्थ:-ग, घ ज, झ ड, ढं द, ध भ
  • अर्धस्वर व्यंजन (४) – य र ल व
  • उष्मा, घर्षक व्यंजन (३) – ष श स ( यामध्ये महाप्राण सुद्धा )
  • महाप्राण व्यंजन ( १४ ) – ह् आणि बाकीचे खालील प्रमाणे ह् वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून या वर्णाला महाप्राण असे म्हणतात.

उदाहरणार्थ-

ख् (क् + ह), घ् (ग् + ह), छ् (च् + ह), झ् (ज् + ह) खु, घ्, छ, झ, ठ, ढ, थ्, ध, फ, भू, श्, ष, स, या वर्णात ह, या वर्णाची छटा असल्याने त्यांना सुध्दा महाप्राण असे म्हणतात. मराठीतील जो वर्ण इंग्रजीत लिहीतांना H अक्षर वापरावे लागते त्या सर्व वर्णाना महाप्राण बाकीचे अल्पप्राण आहेत. क् ग, ङ, च, ज्, त्र, ट ड ण्, या वर्णात ‘ह’ ची छटा नसते.

  • स्वतंत्र व्यंजन (१) – ळ् हा मराठीतील स्वतंत्र वर्ण मानला जातो, तो इतर भाषेकडून घेतलेला नाही.

वर्णाची उच्चार स्थाने  

जोडाक्षरांचे लेखन 

  • एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की त्या संयुक्त व्यंजनाला द्वित असे म्हणतात.

उदाहरणार्थ:- क + क – क्क, त + त – त्त

  • ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास जोडाक्षरे असे म्हणतात. उदाहरणार्थ:- विद्यालय मध्ये या (द + य + आ ) मध्ये उभा दंड असणारी व्यंजने – क, फ
  • शेवटी उभा दंड असणारी व्यंजने = ग, ण, श
  • अर्धा दंड असणारी आणि अर्धी होऊ शकणारी व्यंजने छ ळ
  • अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने = ट, ठ, ड, ढ, द, ह
  • दंड नसलेले व्यंजन – र

मराठीत प्रत्येक वर्णाचा पूर्णोच्चार होतो. त्याशिवाय त्याचे लांबट व तोकडा असेही उच्चार होतात.

शब्द आणि पद 

तोंडावाटे निघणा-या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो.

हे ध्वनी आपण कागदावर लिहून दाखविताना विशिष्ट चिन्हे दाखवितो, वापरतो. हे ध्वनींच्या चिन्हांना आपण अक्षरे असे म्हणतो.

उदाहरणार्थ:-

ब, द, क ही तीन अक्षरे आहेत. ही अक्षरे विशिष्ट क्रमाने आल्यामुळे त्यांना अर्थ प्राप्त झाला आहे, म्हणून ‘बदक’ हा शब्द तयार झाला.

एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण वाक्य असे म्हणतो.

‘बदक पाण्यात पोहते’ हे वाक्य आहे.

या वाक्यात तीन पदे आहेत. पद व शब्द यांत थोडा फरक आहे.

‘पाणी’ हा शब्द आहे. ‘पाण्यात’ हे पद आहे.

वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ स्वरुपात बदल करुन त्या शब्दाचे जे रुप तयार होते, त्यास पद असे म्हणतात, पण व्याकरणात पदांना देखील स्थूलमानाने ‘शब्द’ असे म्हटले जाते . 

उदाहरणार्थ:- ‘स्वातीने’ हे पद आहे. यात मूळ शब्द ‘स्वाती आहे. मूळ शब्दाला व्याकरणात ‘प्रकृती ‘ असे म्हणतात. ‘ने’ हा प्रत्यय लागून ‘स्वातीने’ हे जे रुप झाले त्याला ‘विकृती’ असे म्हणतात.

विकृती म्हणजे शब्दांच्या मूळ रुपाचे बदललेले रुप. यालाच ‘पद‘ असे म्हणतात.

वाक्य हे शब्दांचे किंवा पदांचे बनलेले असते. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top