शब्दसमूहा बद्दल एक शब्द.

मराठी व्याकरणामध्ये ‘शब्दसमूहाबद्दल एक शब्द’ हा भाग शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. लांबलचक वाक्य न वापरता एकाच शब्दातून तो अर्थ व्यक्त करणे म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द होय.
खालील तक्त्यात ५० महत्त्वाचे शब्दसमूह आणि त्यांच्यासाठी वापरले जाणारे शब्द दिले आहेत त्या खाली आलेले आणि येऊ शकणारे असे सर्व आहेत. 
 
शब्दसमूह आणि त्यासाठी एक शब्द
 
क्रमांक शब्दसमूह एक शब्द
१ ज्याला कधीच मृत्यू नाही असा अमर
२ ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजातशत्रू
३ समाजाची सेवा करणारा समाजसेवक
४ तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश द्विकल्प
५ दररोज प्रसिद्ध होणारे पत्र दैनिक
६ आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे साप्ताहिक
७ पंधरा दिवसांतून एकदा प्रसिद्ध होणारे पाक्षिक
८ महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे मासिक
९ वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक
१० इच्छिलेली वस्तू देणारा काल्पनिक वृक्ष कल्पवृक्ष
११ इच्छिलेली वस्तू देणारी काल्पनिक गाय कामधेनू
१२ दगडावर कोरलेले लेख शिलालेख
१३ डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता बोगदा
१४ ज्याला आई-वडील नाहीत असा अनाथ
१५ ज्याचे आकलन होत नाही असे अकलनीय
१६ देवाची पूजा करणारा पुजारी
१७ पाहणारे लोक प्रेक्षक
१८ ऐकणारे लोक श्रोते
१९ भाषण देणारा वक्ता
२० लिहिणारा लेखक
२१ मोजता येणार नाही असे अगणित / अलोट
२२ विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण पाणपोई
२३ घोड्यांना बांधण्याची जागा पागा / तबेला
२४ दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावंबी
२५ स्वतःचे काम स्वतः करणारा स्वावलंबी
२६ मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण सदावर्त / अन्नछत्र
२७ ज्याला लिहिता-वाचता येत नाही असा निरक्षर
२८ ज्याला लिहिता-वाचता येते असा साक्षर
२९ आकाश जिथे जमिनीला टेकल्यासारखे वाटते ते ठिकाण क्षितिज
३० ज्याला कशाचीही उपमा देता येणार नाही असे अनुपम
३१ दोन नद्या एकत्र मिळण्याचे ठिकाण संगम
३२ पायापासून डोक्यापर्यंत आपादमस्तक
३३ खूप पाऊस पडणे अतिवृष्टी
३४ अजिबात पाऊस न पडणे अनावृष्टी
३५ ज्याला कशाचीही भीती नाही असा निर्भय
३६ शत्रूला सामील झालेला घरभेदी
३७ उपकार मानणारा कृतज्ञ
३८ उपकार न मानणारा कृतघ्न
३९ जुन्या मतांना चिकटून राहणारा सनातनी / कर्मठ
४० नवीन विचारांचा स्वीकार करणारा सुधारक
४१ ज्याला सीमा नाही असा असीम
४२ मृत्यूवर विजय मिळवणारा मृत्युंजय
४३ सतत काम करणारा दीर्घोद्योगी
४४ कोणाचेही नाव न घेता लिहिलेले पत्र निनावी
४५ माकडाचा खेळ करणारा दरवेशी
४६ अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी
४७ सापाचा खेळ करणारा गारुडी
४८ केलेले उपकार विसरणारा कृतघ्न
४९ स्वतःच्या फायद्याचे बघणारा स्वार्थी
५० गावातील लोकांची एकत्र येण्याची जागा चावडी
 मागील वेगवेगळ्या सरळ सेवा परिक्षामध्ये आलेले – शब्दसमूह 
 
क्रमांकशब्दसमूह एक शब्द
१मागाहून जन्मलेला (धाकटा भाऊ)अनुज
२मोफत अन्न मिळण्याचे ठिकाणअन्नछत्र
३केलेले उपकार विसरणाराकृतघ्न
४केलेले उपकार जाणणाराकृतज्ञ
५जगाचा स्वामीजगन्नाथ
६जन्मापासूनचे उपजत गुणजन्मगुण
७थोर पुरुषांच्या जन्मतिथीचा दिवसजयंती
८जन्मापासून कायमचा दरिद्रीजन्मदरिद्री
९जन्मतःच श्रीमंत असलेलागर्भश्रीमंत
१०जेथे जन्म झाला आहे तो देश/ठिकाणजन्मभूमी
११पुष्कळ जमीन असलेलाजमीनदार
१२एकाच वेळी अनेक गोष्टींकडे लक्ष देणाराअष्टावधानी
१३परमेश्वराशी एकरूप होणेअद्वैत
१४मरण येईपर्यंतआमरण
१५पायापासून डोक्यापर्यंतआपादमस्तक
१६देव आहे असे मानणाराआस्तिक
१७देव नाही असे मानणारानास्तिक
इतर महत्वाचे शब्दसमूह 
 
क्रमांकशब्दसमूह एक शब्द
१सतत एकटे राहण्याची आवड असलेलाएकलकोंडा
२लहान मुलाला झोपवण्यासाठी म्हटलेले गाणेअंगाई गीत
३पूर्वी कधीही न घडलेले / न ऐकलेलेअभूतपूर्व
४अंग राखून (आळसाने) काम करणाराअंगचोर
५कानाला ऐकायला गोड लागणारेकर्णमधुर
६सर्व इच्छा पूर्ण करणारी काल्पनिक गायकामधेनू
७डोंगरात राहणारे लोक (आदिवासी)गिरीजन
८ज्याच्या हातात चक्र आहे असा (विष्णू/कृष्ण)चक्रपाणी
९ज्याचे मुख चंद्राप्रमाणे सुंदर आहे अशीचंद्रमुखी
१०तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले लेखताम्रपट
११स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशात जाणेदेशांतर
१२नशिबावर विश्वास ठेवून वागणारादैववादी
१३कोणतीही अपेक्षा न ठेवणारानिरपेक्ष
१४ज्याला कशाचीही भीती वाटत नाही असानिर्भय
१५घरदाराला व मायभूमीला पारखा झालेलानिर्वासित
१६नाणी पाडण्याची (तयार करण्याची) जागाटांकसाळ

सराव करण्यासाठी काही महत्वाचे – शब्दसमूह 

क्रमांकशब्दसमूह एक शब्द
१पंधरा दिवसांचा कालावधीपंधरवडा
२निरर्थक गोष्टी किंवा गप्पाभापडकथा
३माकडांचा खेळ करणारामदारी
४हमखास लागू पडणारा खात्रीचा उपायरामबाण
५पहाटेचा सुखद समय (वेळ)रामप्रहर
६एका नवीन युगाची स्थापना करणाराशककर्ता
७दुसऱ्याच्या मनातील विचार जाणणारामनकवडा
८शेतकऱ्यांना मिळणारे शासकीय कर्जतगाई
९तिथी, वार, नक्षत्र इत्यादींची माहिती असलेली पुस्तिकापंचांग
१०दुपारच्या भोजनानंतर घेतलेली अल्प झोपवामकुक्षी
११ज्याला काहीही माहिती नाही असाअनभिज्ञ
१२जे माहीत नाही तेअज्ञात
१३ज्याला कोणीही शत्रू नाही असाअजातशत्रू
१४ज्याला मरण नाही असाअमर
१५जो कधीही जिंकला जात नाही असाअजिंक्य
१६झाडांचा दाट समूहझाडी
१७बाहेरून डौल न दाखवणारा पण खरोखरी गुणी मनुष्यझाकलेला माणिक
१८नारळाच्या झाडाची पानेझावल्या
१९दांडगाईने किंवा अव्यवस्थितपणे चालविलेला कारभारझोटिंगशाही
२०तंतुवाद्यावर छेडलेले मधुर स्वरझंकार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top