वाक्प्रचार.

वाक्प्रचार हे भाषेचे दागिने आहेत. वाक्प्रचारांचा अर्थ हा शब्दांच्या अर्थापेक्षा वेगळा आणि अधिक प्रभावी असतो.
येथे महत्त्वाचे वाक्प्रचार आणि त्यांचे स्पष्टीकरण (अर्थ) ३ कॉलममध्ये दिले आहे
 
महत्त्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ (स्पष्टीकरण)
 
क्रमांकवाक्प्रचारअर्थ / स्पष्टीकरण
अक्कल पाजळणेस्वतःचा शहाणपणा दाखवण्याचा प्रयत्न करणे.
अंगाचा तिळपापड होणेअतिशय संताप किंवा राग येणे.
अवाक होणेआश्चर्यचकित होऊन गप्प बसणे.
अस्मान ठेंगणे होणेअतिशय आनंद होणे (गर्वाने फुगणे).
डोळे विस्फारणेआश्चर्याने बघणे.
कपाळमोक्ष होणेमरण पावणे.
कात्रीत सापडणेदोन्ही बाजूंनी अडचणीत येणे.
गिळंकृत करणेस्वतःच्या ताब्यात घेणे किंवा फस्त करणे.
घाम गाळणेखूप कष्ट करणे.
१०चव चालवणेलुडबुड करणे किंवा रस घेणे.
११जीवात जीव येणेघबराट कमी होऊन दिलासा मिळणे.
१२तळी उचलणेएखाद्या गोष्टीचे किंवा व्यक्तीचे समर्थन करणे.
१३तोंड घशी पडणेविश्वासघात झाल्यामुळे पंचायत होणे.
१४धुडकावून लावणेस्पष्टपणे नाकारणे.
१५नजर चुकवणेटाळण्याचा प्रयत्न करणे.
१६पाचावर धारण बसणेअतिशय भीती वाटणे.
१७ब्र न काढणेशब्दानेही विरोध न दर्शवणे (गप्प राहणे).
१८मुठीत ठेवणेस्वतःच्या ताब्यात किंवा वर्चस्वाखाली ठेवणे.
१९राम म्हणणेमृत्यू येणे.
२०विडा उचलणेएखादे काम करण्याचे ठामपणे ठरवणे (प्रतिज्ञा करणे).
२१शह देणेदुसऱ्याच्या चालीला काटशह देणे (अडचणीत आणणे).
२२हट्ट धरणेएखाद्या गोष्टीसाठी आग्रह धरणे.
२३हसता हसता पुरेवाट होणेखूप हसणे.
२४हातावर तुरी देणेडोळ्यांदेखत फसवून पळून जाणे.
२५हेवा वाटणेमत्सर वाटणे किंवा हेवा वाटणे.
महत्त्वाचे वाक्प्रचार, अर्थ व वाक्यात उपयोग
 
क्रमांकवाक्प्रचारअर्थवाक्यात उपयोग
अंगाची लाहीलाही होणेरागाने किंवा उष्णतेने अंगाची जळजळ होणे.कडक उन्हामुळे शेतात काम करणाऱ्या गड्याच्या अंगाची लाहीलाही झाली.
डोळे उघडणेचूक लक्षात येणे किंवा पश्चात्ताप होणे.अपघातानंतर हेल्मेटचे महत्त्व समजल्यामुळे राजूचे डोळे उघडले.
आभाळ फाटणेचोहोबाजूंनी संकटे येणे.घरमालकाने घर खाली करायला सांगताच गरिबाचे जणू आभाळ फाटले.
कंबर कसणेएखाद्या कामासाठी पूर्णपणे तयार होणे.परीक्षेसाठी जवळचा वेळ पाहून सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी कंबर कसली.
जीवाचे रान करणेअतिशय कष्ट करणे.मुलाला चांगले शिक्षण मिळावे म्हणून वडिलांनी जीवाचे रान केले.
पित्त खवळणेखूप संताप किंवा अतिशय राग येणे.चोराने पैसे चोरल्याचे समजताच घरमालकाचे पित्त खवळले.
तोंडात बोट घालणेनवल वाटणे किंवा आश्चर्यचकित होणे.चिमुकल्या मुलीचे पाठांतर ऐकून सर्व पाहुण्यांनी तोंडात बोट घातले.
कंठस्नान घालणेठार मारणे.भारतीय जवानांनी सीमेवर घुसखोरी करणाऱ्या शत्रूला कंठस्नान घातले.
रक्ताचे पाणी करणेखूप मेहनत किंवा अतोनात परिश्रम करणे.शेतकऱ्याने शेतात रक्ताचे पाणी करून चांगले पीक मिळवले.
१०आकाश ठेंगणे होणेखूप आनंद होणे.सरकारी नोकरी मिळाल्याचे समजताच समीरला आकाश ठेंगणे झाले.
११केसाने गळा कापणेविश्वासघात करणे.गोड बोलणाऱ्या माणसावर विश्वास ठेवला, पण त्यानेच केसाने गळा कापला.
१२जीव भांड्यात पडणेकाळजी दूर होऊन शांत वाटणे.हरवलेले बाळ सुखरूप घरी परतले तेव्हा आईचा जीव भांड्यात पडला.
१३हात टेकणेनाईलाज होणे किंवा हार मानणे.नादुरुस्त यंत्र दुरुस्त करताना मेकॅनिकने अखेर हात टेकले.
१४साखर पेरणेगोड बोलून आपले काम साधून घेणे.विमा एजंटने साखर पेरून सर्वांना पॉलिसी विकली.
१५तडीस नेणेएखादे काम पूर्णत्वास नेणे.दिलेल्या मुदतीत त्याने आपला प्रकल्प तडीस नेला.

इतर महत्वाचे वाक्प्रचार 

क्रमांकवाक्प्रचारअर्थ / स्पष्टीकरण
अंगात वीज संचारणेअचानक बळ येणे.
कपाळाला हात लावणेहताश होणे, निराश होणे.
अंगाची लाही लाही होणेअतिशय संताप येणे.
कंबर कसणेएखादी गोष्ट करण्यासाठी हिमतीने तयार होणे.
कंठस्नान घालणेठार मारणे.
केसाने गळा कापणेविश्वासात घेऊन विश्वासघात करणे.
कान फुंकणेदुसऱ्याच्या मनात कलुषित भावना निर्माण करणे (चुगली करणे).
अंग चोरून काम करणेआळस करणे किंवा फारच थोडे काम करणे.
अंगवळणी पडणेसवय होणे.
१०कपाळमोक्ष होणेमृत्यू ओढवणे.
११काढता पाय घेणेगंभीर किंवा विरोधी परिस्थिती पाहून निघून जाणे.
१२कान टोचणेकडक शब्दांत चूक लक्षात आणून देणे.
१३कान उपटणेकडक शब्दांत समजावणे / ताकीद देणे.
१४कानावर घालणेएखादी गोष्ट कुणाच्या लक्षात आणून देणे.
१५खांद्याला खांदा भिडवणेसहकार्याच्या भावनेने किंवा एकजुटीने काम करणे.
१६गळ्यात गळा घालणेखूप पक्की मैत्री असणे.
१७चेहरा खुलणेचेहऱ्यावर आनंदाचा भाव येणे.
१८चेहरा पडणेएखाद्या गोष्टीची लाज वाटणे किंवा फजिती होणे.
१ईछातीत धडधडणेखूप भीती वाटणे.
२०जिभेला हाड नसणेवाटेल ते बोलणे.
२१जीव की प्राण असणेअत्यंत प्रिय असणे.
२२डोक्यावर खापर फोडणेस्वतःची चूक असताना दुसऱ्याला दोषी ठरवणे.
२३डोळा असणेनजर असणे (पाळत ठेवणे).
२४डोळा लागणेझोप लागणे.
२५डोळे उघडणेअद्दल घडणे किंवा अनुभवाने सावध होणे.
२६डोळेझाक करणेजाणूनबुजून दुर्लक्ष करणे.
२७डोळे निवणेपाहून समाधान होणे.
२८डोळे पांढरे होणेभीतीने खूप घाबरणे.
२९डोळ्यात धूळ फेकणेखोटे सांगून फसवणे.
३०डोळे विस्फारणेआश्चर्याने पाहणे.
३१डोळे मिटणेमरण पावणे.
३२डोळे वटारणेरागाने पाहणे.
३३तोंड देणेसंकटाचा सामना करणे.
३४तोंड भरून बोलणेमनापासून स्तुती करणे किंवा समाधान होईपर्यंत बोलणे.
३५तोंड काळे करणेकायमचे निघून जाणे.
३६तोंडाचे पाणी पळणेअतिशय घाबरणे.
३७तोंडघशी पडणेविश्वासघात झाल्यामुळे फजिती होणे.
३८तळपायाची आग मस्तकात जाणेअतिशय संतापणे.
३९तोंडात बोट घालणेआश्चर्यचकित होणे.
४०तोंडाला तोंड देणेभांडणे.
४१तोंडाला पाणी सुटणेहाव निर्माण होणे / मोह होणे.
४२तोंडाला कुलूप घालणेगप्प बसणे.
४३दात ओठ खाणेखूप चीड व्यक्त करणे.
४४दात विचकणेनिर्लज्जपणे हसणे.
४५नाक खुपसणेनको तिथे लुडबुड करणे.
४६नाक कापणेअपमान करणे / अब्रू घालवणे.
४७नाक मुरडणेनापसंती दर्शवणे.
४८नाकी नऊ येणेअतिशय दमछाक होणे.
४९नाक घासणेलाचार होऊन माफी मागणे.
५०पाचावर धारण बसणेखूप घाबरणे.

4 thoughts on “वाक्प्रचार”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top