मराठी म्हणी.

मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहामध्ये ‘म्हणी’ (Proverbs) अत्यंत महत्त्वाचे आहेत. 
म्हणी म्हणजे अनुभवाच्या खाणी! पूर्वजांनी त्यांच्या अनुभवातून सांगितलेली छोटी पण अर्थपूर्ण वाक्ये म्हणजे म्हणी.
खालील तक्त्यात महत्त्वाच्या म्हणी आणि त्यांचे सोपे अर्थ आणि त्यामागचा उद्देश दिला आहे
 
मराठीतील महत्त्वाच्या म्हणी व त्यांचे अर्थ
 
क्रमांकम्हणअर्थ
अति तेथे मातीकोणत्याही गोष्टीचा अतिरेक नुकसानकारक ठरतो.
आडात नाही तर पोहऱ्यात कोठून?ज्या गोष्टीचे मूळच अस्तित्व नाही, ती इतरत्र सापडणार नाही.
आपला हात जगन्नाथस्वतःचे काम स्वतः करणेच श्रेयस्कर असते.
इच्छा तेथे मार्गमनात ओढ असेल तर मार्ग आपोआप सापडतो.
उथळ पाण्याला खळखळाट फारकमी ज्ञान असणारा माणूस जास्त बडेजाव मिरवतो.
ऐकावे जनाचे करावे मनाचेसर्वांचे ऐकून घ्यावे, पण योग्य वाटेल तेच करावे.
करावं तसं भरावंजशी कृती असेल, तसेच त्याचे फळ मिळते.
काखेत कळसा आणि गावाला वळसाजवळ असलेली वस्तू शोधण्यासाठी सर्वत्र फिरणे.
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळआपल्याच माणसाने आपल्याच माणसाचे नुकसान करणे.
१०गरज सरो आणि वैद्य मरोकाम संपले की उपकार करणाऱ्याला विसरणे.
११घरोघरी मातीच्या चुलीसर्वत्र परिस्थिती सारखीच असते.
१२चोराच्या मनात चांदणेवाईट काम करणाऱ्याला नेहमी पकडले जाण्याची भीती वाटते.
१३जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाहीमाणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाही.
१४झाकली मूठ सव्वा लाखाचीआपले गुपित राखून ठेवणेच फायद्याचे असते.
१५डोळ्यात तेल घालून पाहणेअतिशय सावधगिरीने किंवा बारकाईने पाहणे.
१६थेंबे थेंबे तळे साचेथोड्या-थोड्या साठवणुकीने मोठा संग्रह होतो.
१७दगडापेक्षा वीट मऊमोठ्या संकटापेक्षा छोटे संकट सहन करणे सोपे जाते.
१८दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतंबाह्य रूपावरून माणसाची पारख करणे चुकीचे ठरते.
१९देश तसा वेशपरिस्थितीनुसार आपण आपल्या वागण्यात बदल करावा.
२०नरो वा कुंजरो वासंभ्रमात टाकणारे विधान करणे.
२१नाव मोठे लक्षण खोटेनाव मोठे पण प्रत्यक्षात मात्र काहीच नसते.
२२पळसाला पाने तीनचकुठेही गेले तरी परिस्थिती सारखीच असणे.
२३बळी तो कान पिळीजो ताकदवान असतो, त्याचेच सर्वत्र चालते.
२४बुडत्याला काठीचा आधारसंकटात सापडलेल्याला थोडीशी मदतही मोठी वाटते.
२५मुलाचे पाय पाळण्यात दिसतातभविष्यातील प्रगती लहानपणीच दिसून येते.
२६रात्र थोडी सोंगे फारवेळ कमी आणि कामे मात्र खूप जास्त असणे.
२७लेकी बोले सुने लागेएकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे.
२८शहाण्याला शब्दाचा मारसमजूतदार माणसाला केवळ बोलणे पुरेसे असते.
२९संथ पाणी खोल असतेशांत दिसणाऱ्या माणसाच्या मनात खूप विचार असू शकतात.
३०हपापाचा माल गपापाचुकीच्या मार्गाने मिळवलेले धन लवकर नष्ट होते.

परीक्षेत आलेले काही उदाहरण 

क्रमांकम्हणअर्थ
पी हळद हो गोरीअति उतावळेपणा दाखविणे.
आपला हात जगन्नाथआपले कर्तृत्व आपल्याच हातात असते.
चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचेप्रत्येकाची वेळ कधी ना कधी येतच असते.
उंटावरचा शहाणामूर्खपणाचा सल्ला देणारा माणूस.
आईजीच्या जीवावर बाईजी उदारदुसऱ्याचा पैसा खर्च करून स्वतःचा मोठेपणा दाखविणे.
नाचता येईना अंगण वाकडेस्वतःला काम जमत नसल्यास कामात दोष काढणे.
छत्तीसाचा आकडाएकमेकांविषयी विरुद्ध मत किंवा शत्रुत्व असणे.
आंधळे दळते, कुत्रं पीठ खातेकाम एकाने करावे आणि फायदा दुसऱ्यानेच घ्यावा.
तेरड्याचा रंग तीन दिवसएखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून लगेच बंद पडणे.
१०आधी पोटोबा, मग विठ्ठोबाआधी पोटाची सोय पाहावी, मग देवधर्म करावा.
११अडला हरी, गाढवाचे पाय धरीअडचणीच्या वेळी मूर्ख माणसाचीही गयावया करावी लागते.
१२आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोनअपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त फायदा होणे.
१३अति शहाणा त्याचा बैल रिकामाजो जास्त शहाणपणा करतो, त्याचे काम कधीच पूर्ण होत नाही.
१४आधी शिदोरी, मग जेजुरीआधी भोजन करावे, मग देवपूजा करावी.
१५दुष्काळात तेरावा महिनाआधीच संकट असताना त्यात आणखी एका संकटाची भर पडणे.
१६असतील शिते तर जमतील भुतेजोपर्यंत फायदा मिळतो, तोपर्यंतच लोक भोवती गोळा होतात.
१७नव्याचे नऊ दिवसनवीन गोष्टीचे कौतुक काही काळच टिकते.
१८अचाट खाणे, मसणात जाणेखाण्यापिण्यात अतिरेक केल्यास प्रकृतीला अपाय होतो.
१९आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईनादोन्ही बाजूंनी मोठी अडचण निर्माण होणे.
२०आलिया भोगासी असावे सादरतक्रार न करता आलेली परिस्थिती स्वीकारणे.
२१आवळा देऊन कोहळा काढणेलहान वस्तू देऊन मोठा लाभ करून घेणे.
२२अंथरूण पाहून पाय पसरावेआपल्या ऐपतीनुसार किंवा ऐपतीप्रमाणेच खर्च करावा.
२३कामापुरता मामाकाम साधून घेण्यापुरतेच गोड बोलणारा माणूस.
२४आपलेच दात, आपलेच ओठआपल्याच माणसाने चूक केल्यामुळे पेचात पडणे.
२५आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास

मुळातच आळशी असलेल्या माणसाला आळस करायला निमित्त मिळणे.

इतर महत्वाच्या म्हणी आणि त्यांचे अर्थ
 
क्रमांकम्हणअर्थ
आईचा काळ, बायकोचा मवाळआईकडे दुर्लक्ष करून बायकोची अति काळजी घेणारा.
आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपलीअत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती करणे.
अळी मिळी गुप चिळीरहस्य उघड होऊ नये म्हणून सर्वांनी गप्प बसणे.
अहो रूपम, अहो ध्वनीएकमेकांच्या उणिवा न काढता उलट खोटी स्तुती करणे.
उडत्या पाखराची पिसे मोजणेसहजपणे अत्यंत अवघड गोष्टीची परीक्षा करणे.
उधारीचे पोते सव्वाहात रितेउधारीने घेतलेल्या व्यवहारात नुकसान ठरलेलेच असते.
उंदराला मांजर साक्षवाईट कृत्य करताना एकमेकांना साथ देणे.
उचलली जीभ लावली टाळ्यालाकोणताही विचार न करता वाटेल ते बोलणे.
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंगहास्यास्पद ठरेल अशा प्रकारचा उतावळेपणा दाखविणे.
१०उथळ पाण्याला खळखळाट फारकमी ज्ञान असणारा माणूस जास्त बढाई मारतो.
११ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नयेचांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.
१२एक ना धड भाराभर चिंध्याएकाच वेळी अनेक कामे हाती घेतल्याने सर्वच अर्धवट राहणे.
१३एका माळेचे मणीसगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे.
१४एका हाताने टाळी वाजत नाहीभांडणात दोष एकाचाच नसतो, दोन्ही पक्षांची चूक असते.
१५ऐकावे जनाचे, करावे मनाचेसर्वांचा सल्ला घ्यावा पण स्वतःला जे योग्य वाटेल तेच करावे.
१६उंटावरून शेळ्या हाकणेकामात आळशीपणा किंवा हलगर्जीपणा करणे.
१७एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीतदोन प्रबळ किंवा सारख्याच स्वभावाच्या व्यक्ती एकत्र राहू शकत नाहीत.
१८कावळ्याच्या शापाने गाय मरत नाहीशुद्र माणसाने केलेल्या निंदेने थोरांचे काहीही नुकसान होत नाही.
१९घोडा मैदान जवळ असणेकशाचीही परीक्षा घेण्याची वेळ लवकरच येणे.
इतर महत्त्वाच्या म्हणी आणि त्यांचे अर्थ
 
क्रमांकम्हणअर्थ
ओळखीचा चोर जीवे न सोडीओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा जास्त धोकादायक असतो.
कर नाही त्याला डर कशालाज्याने काही गुन्हा केला नाही, त्याने भीती बाळगण्याचे कारण नसते.
कामापुरता मामा (ताकापुरती आजी)आपले काम साधून घेईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे.
काळ आला होता, पण वेळ आली नव्हतीमोठे संकट आले असताना त्यातून थोडक्यात बचावणे.
कानामधून आली आणि तिखट झालीनंतर येऊन आधीच्या व्यक्तीपेक्षा वरचढ होणे.
नाव मोठे लक्षण खोटेबडेजाव मोठा पण प्रत्यक्षात कृती मात्र सामान्य असणे.
करावे तसे भरावेजसे कृत्य असेल, त्याप्रमाणेच चांगले-वाईट फळ मिळते.
हपापाचा माल गपापालोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते.
कधी गाडीवर नाव, तर कधी नावेवर गाडीआयुष्यात कधी गरिबी तर कधी श्रीमंती येणे (परिस्थिती बदलणे).

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top