ध्वनीदर्शक शब्द ( प्राणी - आवाज )

महत्त्वाचे ध्वनीदर्शक शब्द (म्हणजेच आवाज)
 
वस्तू / प्राणी / पक्षीआवाजाचे नाव
जात्याचीघरघर
डमरूचेडमडम
नगाऱ्याचेढमढम
मेणबत्तीचेमिनमिणणे
टाळ्यांचा / विजेचाकडकडाट
ढगांचा / हास्यांचागडगडाट
पाण्याचाखळखळाट
पावसाचीरिपरिप / कडकड
नागाचाफुत्कार
वाऱ्याचीझुळूक / घोंघावणे
बांगड्यांचीकिणकिण
पैंजणांचीछुमछुम
नाण्यांचाछनछनाट
तलवारीचाखणखणाट
पणतीचेतेवणे
चिमणीचीचिवचिव
कोंबड्याचेआरवणे / बांग देणे
पाखरांचाकिलबिलाट
गाईचेहंबरणे
घोड्याचेखिंकाळणे
मधमाशीचेगुंजारव / गुणगुण
कोल्ह्याचीकोल्हेकुई
बैलाचेडरकणे
शेळीचेबें – बें
म्हशीचेरेकणे
भ्रमराचे (भुंगा)रुणुझुणु / गुंजन
पारव्याचे / कबुतराचेघुमणे
बेडकाचेडरावणे
यंत्राचाखडखडाट
विजा / दिव्यांचालखलखाट
धनुष्याचाटणत्कार
पानांची / गवताचीसळसळ
शंखांचाशंखनाद
घंटेचाघंटानाद / घणघणाट
समुद्राच्या लाटांचीगाज
घुबडाचाघुत्कार
कोकिळेचेकुहूकुहू
ताशाचीतडतड
कावळ्याचीकावकाव
पक्ष्यांचाकलकलाट
पंखांचीफडफड
कुत्र्याचेभुंकणे
वाघाचीडरकाळी
सिंहाचीगर्जना
हत्तीचेचित्कारणे
रक्ताचीभळभळ
अश्रूंचीघळघळ
महत्त्वाची टीप: काही वेळा एकाच वस्तूचे दोन वेगवेगळे आवाज असू शकतात (उदा. पावसाची रिपरिप किंवा मुसळधार पाऊस असेल तर धो-धो).

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top