विभक्ती.
ü वाक्यातील शब्दांचा त्यातील मुख्य शब्दाशी किंवा इतर शब्दांशी जो काही संबंध असतो त्या संबंधाला व्याकरणात कारक असे म्हणतात.
ü वाक्यातील शब्दांचा संबंध दाखविण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरुपात जो बदल किंवा विकार होतो त्याला व्याकरणात विभक्ती असे म्हणतात.
ü शब्दातील नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्यांना विभक्ती म्हणतात.
ü नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात.
ü नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडतात त्यास प्रत्यय असे म्हणतात.
ü शब्दांना जी अक्षरे जोडली जातात किंवा शब्दांना बदल ज्या अक्षरांनी दाखवला जातो त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात. उदा. ल्या, ल, ला, ली
ü विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या स्वरूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात .
ü वाक्यात नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाची जो संबंध असतो त्याला कारकसंबंध असे म्हणतात आणि त्या विभक्तीला कारक विभक्ती अस म्हणतात वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदासाठीचे संबंध असतात त्यांना कारकार्थ असे म्हणतात आणि क्रियापदाचे व इतर शब्दांशी असलेले संबंध असतात त्या संबंधांना उपपदार्थ असे म्हणतात
è नामांचा क्रियापदाची किंवा इतर शब्दांशी असलेला संबंध आठ प्रकारचा असतो म्हणून मराठी भाषेत एकूण आठ विभक्ती आहेत त्या पुढील प्रमाणे
विभक्ती | प्रत्यय ( एकवचनी ) | अनेकवचन | कारकार्थ |
प्रथमा
द्वितीया
तृतीया
चतुर्थी
पंचमी
षष्ठी
सप्तमी
संबोधन | मी
स ला ते
ने ए शी
स ला ते
ऊन हून
चा ची चे
त ई आ
– | –
स ला ना ते
नी ई शी ही
स ला ना ते
ऊन हून
चे च्या ची
त ई आ
नो | कर्ता ( प्रत्यय नसतो )
कर्म
करण
संप्रदान
अपादान
संबंधी
अधिकरण
हाक मारणे |
विभक्तीचे कारकार्थ चे प्रकार पुढीलप्रमाणे :-
कर्ता :- क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा वाक्यात कोणीतरी असतो त्याला कर्ता असे म्हणतात. कर्त्यांची प्रथमा विभक्ती असते म्हणून प्रथमेचा प्रमुख कारकार्थ कर्ता असतो.
उदा. आदित्य ज्यूस पितो.
कर्म : कर्त्याने केलेली क्रिया कोणावर तरी घडलेली किंवा घडते हे सांगणारा शब्द म्हणजे ‘कर्म‘ होय. कर्माची द्वितीया असते, म्हणून द्वितीयेचा प्रमुख कारकार्थ कर्म असतो.
उदा. राकेश काम करतो.
करण :-वाक्यातील क्रिया ज्या साधनाने घडते किंवा ज्याच्या साधनाने घडते त्याला करण असे म्हणतात. ‘करण‘ म्हणजे साधन. मी सुरीने सफरचंद कापले या वाक्यात कापण्याची क्रिया सुरी या साधनाने केली म्हणून सुरीने या शब्दाची विभक्ती तृतीया असून तृतीयेचा मुख्य कारकार्थ करण आहे.
उदा. सुरेश चाकूने कांदा कापतो.
संप्रदान:-
जेव्हा क्रिया दानाचा अर्थ व्यक्त करते तेव्हा ते दान (कोणतीही
वस्तू) ज्याला करण्यात येते त्याच्या वाचक शब्दाला किंवा देणे, बोलणे, सांगणे इत्यादी अर्थाच्या क्रिया ज्याला उद्देशून घडतात त्या वस्तूला वा स्थानाला संप्रदान असे म्हणतात, जेंव्हा क्रिया दानाचा अर्थ व्यक्त करते तेंव्हा ते दान ज्याला करण्यात येते ‘मी गुरुजीना दक्षिणा दिली‘ या वाक्यात गुरुजीना याची विभक्ती
चतुर्थी व चतुर्थीचा मुख्य कारकार्थ संप्रदान आहे..
उदा. राकेश सुरेशला पुस्तक देतो.
सुरेशला ही चतुर्थी विभक्ती आहे म्हणून चतुर्थीचा प्रमुख कारकार्थ संप्रदान असतो.
अपादान :-
क्रिया जेथून सुरू होते तेथून ती व्यक्ती व वस्तू दूर जाते म्हणजे क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून एख्याद्या वस्तूचा वियोग
दाखवावयाचा असतो त्यास अपादान असे म्हणतात.
उदा – मी शाळेतून आताच घरी आलो या वाक्यातील शाळेतून या शब्दाची विभक्ती पंचमी व पंचमीच्या मुख्य कारकार्थ अपादान आहे.
राजू घरातून बाहेर आला.
घरातून या शब्दाची विभक्ती पंचमी आहे. म्हणून पंचमीचा प्रमुख
कारकार्थ अपादान असतो.
अधिकरण :- वाक्यातील क्रिया कोठे घडली किंवा केंव्हा घडली हे सांगणाऱ्या म्हणजेच क्रियेचे स्थान किंवा काळ दर्शविणा-या शब्दाच्या संबंधास अधिकरण असे म्हणतात.
उदा– रोज दुपारी राजेश दुकानात जातो. दुपारी आणि दुकानात हे शब्द अनुक्रमे क्रियेचा काळ व दुकानात हे शब्द क्रियेचे स्थळ दर्शवित असून त्यांची विभक्ती सप्तमी ही आहे व त्या सप्तमीचा मुख्य कारकार्थ अधिकारण हे आहे.
उदा. दररोज सकाळी मी शाळेत जातो.
या वाक्यातील सकाळी व शाळेत हे शब्द अनुक्रमे क्रियेचा काळ व
स्थल दाखवितात त्यांची विभक्ती सप्तमी व सप्तमीचा
अधिकरण आहे. ( अधिकरण – आश्रय, स्थान )
संबोधन.
संबोधनाचा उपयोग हाक मारताना करतात. जे नाम संबोधन म्हणून वापरले जाते त्याला विकार होतो व प्रत्ययही लागतात म्हणून संबोधन ही आठवी विभक्ती मानतात.
विभक्ती ही कारकार्थवरून मानण्यापेक्षा प्रत्ययावरून मानावी.