मराठी म्हणी.
- पी हळद हो गोरी – अती उतावळेपणा दाखविणे
- आपला हात जगन्नाथ – आपले कर्तुत्व आपल्या हातात असते.
- चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ येत असते .
- उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा माणूस .
- आईजीच्या जीवावर बाईजी उदार -दुसर्याचा पैसा खर्च करून शहाणपण दाखविणे.
- नाचता येईना अंगण वाकडे – आपल्याला कामे हॉट नसल्यास त्यातील दोष दाखवणे.
- छत्तीसाचा आकडा -अकमेकां विषयी विरुद्ध मत असणे
- आंधळे दळते कुत्रं पीठ खाते – एक जन काम करतो आणि दुसरा त्याचा फायदा घेतो.
- तेरड्याचा रंग तीन दिवस – एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे
- आधी पोटोबा मग विठ्ठोबा – आदी पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा.
- अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाचे सुद्धा पाय पकडावे लागतात
- आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळ – अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.
- अति शहाणा त्याचा बैल रिकामा – जो माणूस फार शहाणपणा करायला जातो. त्याचे मुळीच काम होत नाही.
- आधी शिदोरी मग जेजूरी – आधी भोजन मग देवपूजा
- दुष्काळात तेरावा महिना – संकटात अधिक भर होणे .
- असतील शिते तर जमतील भुते – एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात.
- नव्याचे नऊ दिवस – नवेपणा असतानाचे कौतुक नंतर कोणी विचारत नही .
- अचाट खाणे मसणात जाणे – खाण्यापिण्यात अतिरके झाल्यास परिणाम वाईट होतो.
- आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना -दोन्ही बाजूंनी अडचण
- आलीया भोगाशी असावे सादर – कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.
- आवळा देऊन कोहळा काढणे – क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे.
- अंथरूण पाहून पाय पसरावे – आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.
- कामापुरता मामा – काम साधण्यापुरते गोड बोलणे
- आपलेच दात आपलेच ओठ – आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीचे स्थिती निर्माण होणे.
- आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास – मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.
- आईचा काळ बायकोचा मवाळ – आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा
- आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली- अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती.
- अळी मिळी गुप चिळी – रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे.
- अहो रूपम अहो ध्वनी – एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे.
- उडत्या पाखरची पिसे मोजणे – अगदी सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे.
- उधारीचे पोते सव्वाहात रिते – उधारी घेतलेल्या गोष्टीत तोटा ठरलेलाच असतो.
- उंदराला मांजर साक्ष- वाईट कृत्य करतांना एकमेकांना साक्ष देणे.
- उचलली जीभ लावली टाळ्याला – विचार न करता बोलणे.
- उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग – प्रसंगी हास्यास्पद ठरेल आशा प्रकराच्या उतावळेपणा दाखविणे.
- उथळ पाण्याला खळखळाट फार – थोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त बढाई मरतो.
- उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये – कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.
- एक ना घड भारभर चिंध्या – एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्थवट होण्याची अवस्था.
- एका माळेचे मणी – सगळीच जन सारख्या स्वभावाची असतात तेव्हा .
- एका हाताने टाळी वाजत नाही – जेव्हा डोंघामद्धे वाद होतो तेव्हा चूक एकाची नसते.
- ऐकावे जनाचे करावे मनाचे – आधी सर्वांचे ऐकून घ्यावे मग जे योग्य वाटेल तेच करावे.
- उंटावरून शेळ्या हाकणे – आळशी असणे / हलगर्जीपणा करणे
- एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत – दोन सवती एका घरात राहू शकत नाहीत.
- कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही
- घोडामैदानजवळ असणे – परीक्षा लवकरच होणे .
- ओळखीचा चोर जीवे न सोडी – ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा धोकादायक असतो.
- कर नाही त्याला डर कशाला – ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगावयाचे
- कामापुरता मामा – ताकापुरती आजी आपले काम करून घेईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे.
- काळ आला होता. पण वेळ आली नव्हती – नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे.
- कानामगून आली आणि तिखट झाली – मागून येऊन वरचढ होणे.
- नाव मोठे लक्षण खोटे – कीर्ती मोठी पण कृती छोटी
- करावे तसे भरावे- जसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगलेवाईट फळ भोगावे लागते.
- हपापाचा माल गपापा – लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते
- कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी – कधी गरीबी तर कधी श्रीमंती येणे.