रस
मराठी भाषेत एकूण ९ रस आहे त्यातील महत्वाचे थोडक्यात पाहू .
1 शृंगार – स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून, आकर्षणातून
या रसाची निर्मिती होते .
उदा.- १) तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंगमहाल.
२) या कातरवेळी पाहिजेस तू जवळी.
2. वीररस – पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनातून वीररस निर्माण होतो.
उदा.- १) गर्जा जयजयकार, क्रांतीचा गर्जा जयजयकार.
२) उठा राष्ट्र वीर हो, सज्ज व्हा उठा चला
3. करुणरस – शोक किंवा दुख वियोग संकट हृदयद्रावक अशा गोष्टींच्या वर्णनातून करुणरस निर्माण झालेला दिसतो.
उदा.- १) हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला.
२) आई म्हणोनि कोणीआईस हाक मारी.
4. शांतरस – परमेश्वरविषयक भक्ती, सत्पुरुषाची संगती, पवित्र वातावरणाचे वर्णन यांत शांतरस आढळतोउदा.-
१) आनंद न माय गगनी । वैष्णव नाचती रंगणी.
२) आता विश्वात्मके देवे । तोषनी मज द्यावे पसायदान है ।।
5. भय भयानक हा रस आढळतो युद्ध मृत्यू होऊन सोड स्मशान इत्यादींच्या वर्णनात
उदा १.) तो गुरासारखा ओरडला त्याच्या सारे रक्त होईल ते पालथे झाले
व त्याने जोरात काळी फोडली
6. जुगुत्सा विभक्त हा रस आढळतो किळस तिटकारा याच्या वर्णनात
उदा – १.) मुंबईचा कामगार चाळीतले दहा बाय दहाच्या बाराच्या घरात कचऱ्याच्या ढिगारे शेजारी ओकारी आणणाऱ्या दुर्गंधीत आयुष्यभर कितपत पडलेला असतो .
7. विस्मय अद्भुत हा रस आढळतो लहान मुलांच्या किंवा काल्पनिक मोहक गोष्टींमध्ये .
उदा – सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला .