वाक्प्रचार.

  • अंगात वीज संचारणे- अचानक बळ येते.
  • कपाळाला हात लावणे- हताश होणे, निराश होणे.
  • अंगाची लाही लाही होणे- अतिशय संताप येणे.
  • कंबर कसणे- एखादी गोष्ट करण्यासाठी हिमतीने तयार होणे.
  • कंठस्नान घालने – ठार मारणे.
  • केसाने गळा कापणे- विश्वासात घेऊन विश्वास घात करणे.
  • कान फुंकणे- दुसऱ्याच्या मनात कल्शिक निर्माण करणे, चूगली करणे.
  • अंग चोरून काम करणे – फारच थोडे काम करणे.
  • अंगवळणी पडणे- सवाय होणे.
  • कपाळमोक्ष पडणे- मृत्यू ओढवणे.
  • काढता पाय घेणे: गंभीर किंवा विरोधी परिस्थिती पाहून निघून जाणे.
  • कान टोचणे- चूक लक्षात आणून देणे.
  • कान उपटणे- कडक शब्दांत समजावणे.
  • कानावर घालने- लक्षात आणून देणे.
  • खांद्याला खांदा भिडवने: सहकार्याच्या भावनेने काम करणे, एकजुटीने काम करणे.
  • गळ्यात गळा घालने- खोल प्रेमाचे भावना असणे, खूप पक्की मैत्री असणे.
  • चेहरा खुलणे- चेहऱ्यावर आनंदाचा भाव येणे.
  • चेहरा पडणे- एखाद्या गोष्टीची लाज वाटणे.
  • छातीत धडधडणे- खूप भीती वाटणे.
  • जिभेला हाड नसणे- वाटेल ते बोलणे.
  • जीव की प्राण असणे- अत्यंत प्रिय असणे.
  • डोक्यावर खापर फोडणे- चूक नसतानाही एखाद्याला दोषी ठरवणे.
  • डोळा आसणे- नजर असणे.
  • डोळा लागणे- झोप लागणे.
  • डोळे उघडणे- अद्दल घडणे, अनुभवाने सावध होणे.
  • डोळेझाक करणे- दुर्लक्ष करणे.
  • डोळे निवणे- समाधानी होणे.
  • डोळे पांढरे होणे- धक्कादायक प्रसंग निर्माण होणे, भीतीने खूप घाबरणे.
  • डोळ्यात धूळ फेकणे- खोटे सांगून फसवणे.
  • डोळे विस्फारणे- आश्चर्याने पाहणे.
  • डोळे मिटणे- मरण पावणे.
  • डोळे वटारणे- रागाने पाहणे.
  • तोंड देणे- सामना करणे.
  • तोंड भरून बोलणे- मनाने समाधान होईपर्यंत बोलणे.
  • तोंड काळे करणे- कायमचे निघून जाणे.
  • तोंडाचे पाणी पळणे- अतिशय घाबरणे.
  • तोंडघशी पडणे- विश्वास घात होणे.
  • तळपायाची आग मस्तकात जाणे- अतिशय संतापणे.
  • तोंडात बोट घालणे- आश्चर्य चकित होणे.
  • तोंडाला तोंड देणे- भांडणे.
  • तोंडाला पाणी सुटणे- हाव निर्माण होणे.
  • तोंडाला कुलूप घालणे- गप्प बसणे.
  • दात ओठ खाणे- चीड व्यक्त करणे.
  • हात वीचकणे- निर्जल्लित होऊन हसणे.
  • नाक खुपसणे- नको तेथे सहभागी होणे.
  • नाक कापणे- अपमान करणे.
  • नाक मुरडणे- नापसंती दर्शवणे.
  • नाकी नऊ येणे- फार दगदग होणे.
  • नाक घासणे- लाचार होऊन माफी मागणे

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top