व्यक्ति प्रचारक शब्द.
@ मचान – उंचावर बांधलेली निरीक्षणाची जागा
@ शिलेदार – स्वतःचा घोडा घेऊन लष्करी नोकरी करणारा
@ तांडेल – बैलांच्या तांड्यावरचा मुख्य लमाण
@ सणगर – घोंगड्या विणाऱ्या जातीचा इसम
@ घर कोबंडा – शक्यतो घराबाहेर न पडणारा
@ उंटावरचा शहाणा – मूर्खपणाचे सल्ले देणारा
@ परिव्राजक – सन्यास स्वीकारलेला
@ याज्ञिक – धर्मसंस्कारविधी करणारा
@ मौलाना – मुस्लिम धर्मशास्त्रवेत्ता व शिक्षक
@ मुनसफ / मुन्सिफ – कनिष्ठ दिवाणी कोर्टातला न्यायाधीश
@ रडतराऊत – नेहमी रडगाणे गाणारा
@ मुमुऱ्षू – मरण्याच्या बेतात असलेला
@ रत्नपारखी – जड जवाहिराची पारख असणारा
@ अस्तनीतील निखारा – जवळचा पण घरभेदी वृत्ती असणारा
@ माथाडी – डोक्यावर ओझे वाहून नेणारा कामगार
@ चिटणीस – पत्रव्यवहारासारखी काम करणारा शासकीय अधिकार।
@ साळी – हातमागावर पारंपरिक पद्धतीने वस्त्र मिळविणारा
@ तांबोळी – विड्याची पाने विकणारा / करणारा
@ नबी – भविष्य कथन करणारा ज्योती ( मुस्लिम व्यक्ति )
@ ट्युपिक – एस्किमो लोकांचे घर (उन्हाळी घर)
@ डोंबारी – कसरतीचा खेळ करणारा
@ बुरूड – कळकाच्या कामठ्यापासून सुप, टोपल्या बनविणारा
@ अधीक्षक – सर्व प्रशासकीय बाजू पाहणारा अधिकारी
@ युर्ट – किरगिज लोकांचे घर (कातडी तंबूचे घर)
@ कर्णाचा अवतार – अतिशय उदार मनुष्य ( कुंतीपुत्र कर्ण )
@ कुंभकर्ण – झोपाळू मनुष्य
@ पोतराज – अंगावर आसुडाचे फटके मारून कला दाखविणारा
@ बाघ्या मुरुळी – देवाला सोडले गेलेले पुरुष व स्त्री
@ सोंगाड्या – वगनाट्यात विविध भूमिका करणारा
@ मोरमाची – अरण्यातील मोरांचे मिलन स्थळ
@ पांझरपोळ – म्हाताऱ्या गुरांना सांभाळण्याचे ठिकाण
@ गवाबैसन – रानव्यांच्या कळपाची आश्रयाची जागा