वाक्प्रचार.
- अंगात वीज संचारणे- अचानक बळ येते.
- कपाळाला हात लावणे- हताश होणे, निराश होणे.
- अंगाची लाही लाही होणे- अतिशय संताप येणे.
- कंबर कसणे- एखादी गोष्ट करण्यासाठी हिमतीने तयार होणे.
- कंठस्नान घालने – ठार मारणे.
- केसाने गळा कापणे- विश्वासात घेऊन विश्वास घात करणे.
- कान फुंकणे- दुसऱ्याच्या मनात कल्शिक निर्माण करणे, चूगली करणे.
- अंग चोरून काम करणे – फारच थोडे काम करणे.
- अंगवळणी पडणे- सवाय होणे.
- कपाळमोक्ष पडणे- मृत्यू ओढवणे.
- काढता पाय घेणे: गंभीर किंवा विरोधी परिस्थिती पाहून निघून जाणे.
- कान टोचणे- चूक लक्षात आणून देणे.
- कान उपटणे- कडक शब्दांत समजावणे.
- कानावर घालने- लक्षात आणून देणे.
- खांद्याला खांदा भिडवने: सहकार्याच्या भावनेने काम करणे, एकजुटीने काम करणे.
- गळ्यात गळा घालने- खोल प्रेमाचे भावना असणे, खूप पक्की मैत्री असणे.
- चेहरा खुलणे- चेहऱ्यावर आनंदाचा भाव येणे.
- चेहरा पडणे- एखाद्या गोष्टीची लाज वाटणे.
- छातीत धडधडणे- खूप भीती वाटणे.
- जिभेला हाड नसणे- वाटेल ते बोलणे.
- जीव की प्राण असणे- अत्यंत प्रिय असणे.
- डोक्यावर खापर फोडणे- चूक नसतानाही एखाद्याला दोषी ठरवणे.
- डोळा आसणे- नजर असणे.
- डोळा लागणे- झोप लागणे.
- डोळे उघडणे- अद्दल घडणे, अनुभवाने सावध होणे.
- डोळेझाक करणे- दुर्लक्ष करणे.
- डोळे निवणे- समाधानी होणे.
- डोळे पांढरे होणे- धक्कादायक प्रसंग निर्माण होणे, भीतीने खूप घाबरणे.
- डोळ्यात धूळ फेकणे- खोटे सांगून फसवणे.
- डोळे विस्फारणे- आश्चर्याने पाहणे.
- डोळे मिटणे- मरण पावणे.
- डोळे वटारणे- रागाने पाहणे.
- तोंड देणे- सामना करणे.
- तोंड भरून बोलणे- मनाने समाधान होईपर्यंत बोलणे.
- तोंड काळे करणे- कायमचे निघून जाणे.
- तोंडाचे पाणी पळणे- अतिशय घाबरणे.
- तोंडघशी पडणे- विश्वास घात होणे.
- तळपायाची आग मस्तकात जाणे- अतिशय संतापणे.
- तोंडात बोट घालणे- आश्चर्य चकित होणे.
- तोंडाला तोंड देणे- भांडणे.
- तोंडाला पाणी सुटणे- हाव निर्माण होणे.
- तोंडाला कुलूप घालणे- गप्प बसणे.
- दात ओठ खाणे- चीड व्यक्त करणे.
- हात वीचकणे- निर्जल्लित होऊन हसणे.
- नाक खुपसणे- नको तेथे सहभागी होणे.
- नाक कापणे- अपमान करणे.
- नाक मुरडणे- नापसंती दर्शवणे.
- नाकी नऊ येणे- फार दगदग होणे.
- नाक घासणे- लाचार होऊन माफी मागणे