शब्दसमूहा बद्दल एक शब्द.
अनुज – मागाहून जन्मलेला ( धाकटा भाऊ )
अन्नछत्र – मोफत अन्न मिळण्याचे ठिकाण
कृतघ्न – केलेले उपकार विसरणारा
जगन्नाथ – जगाचा स्वामी
जन्मगुण – जन्मापासून उपजत गुण
जयंती – थोर पुरुष, समाजसेवक, साधुसंत ह्यांच्या जन्मतिथीचा दिवस
जन्मदरिद्री – जन्मापासून कायमचा दरिद्री
जमीनदार – पुष्कळ जमीन असलेला
अष्टावधाणी – एकाच वेळी अनेक अवधाने राखून काम करणारा
अद्वेत – परमेश्वराशी एकरूप होणे
आमरण – मरण येईपर्यंत
अपाद मस्तक – पायापासून डोक्यापर्यंत
आस्तिक – देव आहे असे मानणारा
नास्तिक – देव नाही असे मानणारा
जन्मभूमी – जेथे जन्म झालेला आहे तो देश
कृतज्ञ – केलेले उपकार जाणणारा
गर्भ श्रीमंत – जन्मत श्रीमंत असलेला
एकलकोंडा – सतत एकटे राहण्याची आवड असलेला
अंगाई गीत – लहान मुलाला झोपण्यासाठी म्हटलेले गीत
अभूतपूर्व – पूर्वी कधीही न ऐकलेले
अंगचोर – अंग राखून काम करणारा
कर्ण मधुर – कानास गोड लागणारे
कामधेनु – सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय
गिरीजन – डोंगरात राहणारे लोक
चक्रपाणी – ज्याच्या हातात चक्र आहे असा ( कृष्ण )
चंद्रमुखी – ज्याचे मूख चंद्राप्रमाणे आहे अशी
ताम्रपट – तांब्याच्या पत्रावर कोरलेले लेख
देशांतर – एक ते सोडून दुसऱ्या देशात जाणे
देववादी – नशिबावर विश्वास ठेवून वागणारा
निरपेक्षक – कसलीही अपेक्षा नसलेला
निर्भय – ज्याला कशाची भीती वाटत नाही असा
निर्वासित – घरजारास व मायभूमीस मुकलेला
टांकसाळ – नाणी पाडण्याची जागा
पंधरवडा – पंधरा दिवसांचा कालावधी
भापडकथा – निरर्थक गोष्टी किंवा गप्पा
मदारी – माकडांचा खेळ करणारा
रामबाण – हमखास लागू पडणारा उपाय
राम प्रहर – पहाटेचा सुखद समय
शककर्ता – एका नवीन युगाची स्थापना करणारा
मनकवडा – दुसऱ्याच्या मनातील विचार जाणणारा
तगाई – शेतकऱ्यांना मिळणारे शासकीय कर्ज
पंचांग – तिथी वार नक्षत्र योग इत्यादींची माहिती असणारी पुस्तिका
वामकुक्षी – दुपारच्या भोजनानंतर घेतलेली झोप
अनभिज्ञ – काहीही माहिती नसलेला
अज्ञात – जे माहीत नाही ते
अजातशत्रू – ज्याला कोणीही शत्रू नाही असा
अमर – ज्याला मरण नाही असा
अजिंक्य – कधी जिंकला न जाणारा
झाडी – झाडांचा दाट समूह
झाकलेला माणिक – बाहेरून डौल न दाखवणारा पण खरोखरी गुणी मनुष्य
झावल्या – नारळाच्या झाडाची पाने
झोटिंगशाही – दांडगाईने किंवा अव्यवस्थितपणे चालविलेला कारभार
झंकार – तंतुवाद्यावर छेडलेले मधुर स्वर