वाक्यांचे प्रकार.

मराठी व्याकरणात वाक्यांचे खालील दोन प्रकार पडतात

1. अर्थावरून पडणारे प्रकार

2. वाक्यात असणाऱ्या विधांनांवरून पडणारे प्रकार

. अर्थावरून पडणारे प्रकार

अर्थावरून वाक्याचे मुख्य प्रकार चार प्रकार पडतात.

१)          विधानार्थी वाक्य

२)          आज्ञार्थी वाक्य

३)          प्रश्नार्थक वाक्य

४)          उद्गारार्थी वाक्य

१) विधानार्थी वाक्य   जेंव्हा एखाद्या गोष्टी विषयी विधान केले जाते. त्या वाक्य प्रकारास विधानार्थी वाक्य म्हणतात.

उदा : १) कावळ्याने चिमणीची अंडी खाल्ली.

 

 विधानार्थी वाक्याचे परत पुढे दोन भाग पडतात.

अ)    होकारार्थी वाक्य     ब) नकारार्थी वाक्य.

अ) होकारार्थी वाक्य : या विधानातून एखाद्या कृतीचा होकार दर्शविला जातो.

उदा : १) मी दहीभात जेवीन.

     २) शिल्पाने कोमलला मारले.

 

 ब) नकारार्थी वाक्य : या विधानातून एखाद्या कृतीचा नकार दर्शविला जातो.

   उदा : १) अजय परीक्षेच्या वेळी गोष्टी पुस्तके वाचत नाही. 

        २)  तो कधीच खोटे बोलत नाही .

 

2) आज्ञार्थी वाक्य-  जेंव्हा एखाद्या विधानावरून आज्ञा दिल्याचा बोध होतो तेंव्हा त्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. उदा : १) महेश दुकानात जा. २). रमेश इकडे ये.

                               ३) देवा सर्वांना सुखी ठेव ४) सर्वांनी रांगेत उभे रहा

 

 

3. प्रश्नार्थक वाक्य या प्रकाराची वाक्ये ही प्रश्न सूचक असतात. या वाक्यातून प्रश्नाचा बोध होतो. उदा :

१)          तू किती वाजता शाळेत जाणार ?

२)          राम काय करतो ?

ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असेल तर ते वाक्य प्रश्नार्थक वाक्य समजावे .

4. उद्गारार्थी वाक्य – ज्या वाक्यात एखाद्या भावनेची तीव्रता उद्गारातून स्पष्ट होते, त्या वाक्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. मराठी व्याकरणात उद्गारार्थी वाक्याला विशेष महत्व आहे.या वाक्यात किती, केवढा, काय इ. शब्द प्रयोग असतात.

उदा : १)          काय ही बडबड !

        २)          अरे बापरे ! केवढा मोठा प्राणी हा !

 

यात आनंद, आश्चर्य, दुःख अशा एखाद्या भावनेतून निघणारे उद्गार आलेले असतात .


 

२. विधानांवरून पडणारे वाक्याचे प्रकार :

विधानांवरून वाक्याचे तीन प्रकार पडतात.

१)          केवल वाक्य

२)          मिश्र वाक्य

३)          संयुक्त वाक्य

 

१) केवल वाक्य : ज्या वाक्यात एकच उदेश्य असून एकच क्रियापद असते, त्यास केवल वाक्य असे म्हणतात. (
केवल वाक्याला शुद्ध वाक्य असेही म्हणतात. )

 उदा : 1) निकिता पुस्तक वाचते.

          2) श्रीमंत व्यक्तीला गरीबाची पर्वा नसते 


२) मिश्र वाक्य : जेव्हा दोन स्वतंत्र वाक्यात गौनत्व बोधक उभयान्वयी अव्यय
जोडून जेव्हा एकच वाक्य त्यात होते त्यास मिश्र वाक्य म्हणतात .

उदा : १) जो मनुष्य चोरी करतो, त्यास
शिक्षा होते.

यात त्यास शिक्षा होतेहे
मुख्य वाक्य असून
जो मनुष्य चोरी करतोहे त्यावर अवलंबून असणारे गौण वाक्य होय.

         2) जे चकाकते ते सोने नसते .

 

मिश्र वाक्य खालील उभयान्वयी अव्ययांनी जोडले जातात

१)          स्वरूप बोधक – की,म्हणून,म्हणजे

२)          कारणबोधक – कारण,का-की,कारण-की

३)          उद्देश्बोधक – म्हणून ,यास्तव

४)          संकेतबोधक – जर-तर,म्हणजे,की

 

 

 3) संयुक्त वाक्य :

जेव्हा दोन किंवा अधिक वाक्य केवलवाक्ये खालील
प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात अशा वाक्यास संयुक्त वाक्य
म्हणतात.

१)          समुच्चयबोधक -आणि,,शिवाय

२)          विकल्पबोधक -अथवा,किंवा,की

३)          न्यूनत्वबोधक -पण,परंतु,परी

४)          परिणामबोधक -म्हणून,सबब 

उदा- देह जाओ अथवा राहो.

       गड आला पण सिंह गेला . मरावे परी कीर्ती रुपी उरावे.

3 thoughts on “वाक्यांचे प्रकार”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top