विरामचिन्ह.

क्र

चिन्हाचे  नाव 

चिन्ह

केव्हा वापरतात

उदाहरण

1

पूर्ण विराम

 .  

1 ) विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे   

   दाखवण्यासाठी

2 ) शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी   

   आद्याक्षरांपूढे

तो घरी गेला .

ता. क. ताजा कलम

2

आर्धविराम 

 ;

1 )दोन छोटी वाक्य उभयान्वयी

अव्ययांनी जोडलेली असतात

ढग खूप गर्जत होते ;पण पाऊस नाही.

3

स्वल्प विराम

 ,

1 )समान वाक्ये निराळी दाखविण्याकरता.

2) एकाच वाक्यात दोन पेक्षा अधिक शब्द आले असता.

 

हुशार , अभ्यासू , खोडकर,

सुरेश इकडे ए,

4

अपूर्णविराम

 :

वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास

पुढील विद्यार्थी नापास झाले: 1,2,12,

5

प्रश्नचिन्ह

 ?

प्रशनार्थक वाक्याच्या शेवटी .

तू केव्हा आलास?

6

उद्गारवाचक चिन्ह

 !

उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापर होतो

अरेरे ! तो पडला

अरेरे ! तो फसला

7

अवतरण चिन्ह

 “ “

एखाद्या वाक्यावर जोर द्यावयाचा असल्यास

एखाद्याच्या व्यक्तीचे तोंडचे शब्द जसेच्या तसे घेतले असता .

तो म्हणाला

“मी येईन “

8

संयोगचिन्हे

 –

दोन शब्द जोडताना

ओळीच्या शेवटी शब्द अपुरा असल्यास

विद्यार्थी – भंडार

9

अपसार चिन्ह

 –

बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास

स्पष्टीकरण द्यायचे असल्यास

 

मी तिथे गेलो, पण-

विरामचिन्हे – अचूक वापराचा तक्ता
 
चुकीचे वाक्यबरोबर वाक्यवापरलेले चिन्ह आणि स्पष्टीकरण
तू कोठे जातोस.तू कोठे जातोस?प्रश्नचिन्ह (?): वाक्यात प्रश्न विचारला असेल तर शेवटी पूर्णविराम न देता प्रश्नचिन्ह द्यावे.
बापरे केवढा मोठा सापबापरे! केवढा मोठा साप!उद्गारचिन्ह (!): भीती, आश्चर्य यांसारख्या तीव्र भावना व्यक्त करणाऱ्या शब्दानंतर उद्गारचिन्ह लागते.
राम लक्ष्मण आणि सीता वनवासात गेले.राम, लक्ष्मण आणि सीता वनवासात गेले.स्वल्पविराम (,): एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास त्यांना वेगळे करण्यासाठी स्वल्पविराम वापरतात.
तो म्हणाला मी येईल.तो म्हणाला, “मी येईल.”दुहेरी अवतरण (” “): बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे सांगताना दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर होतो.
गड आला पण सिंह गेला.गड आला; पण सिंह गेला.अर्धविराम (;): दोन छोटी वाक्ये ‘पण’, ‘परंतु’ सारख्या अव्ययांनी जोडताना पहिल्या वाक्याच्या शेवटी अर्धविराम देतात.
लोकमान्य टिळकांनी सांगितले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.लोकमान्य टिळकांनी सांगितले, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.’एकेरी अवतरण (‘ ‘): एखाद्याच्या प्रसिद्ध वाक्यावर किंवा शब्दावर जोर देताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात.
वि पु काळे हे प्रसिद्ध लेखक आहेतवि. पु. काळे हे प्रसिद्ध लेखक आहेत.पूर्णविराम (.): नावाचा संक्षेप (Initial) लिहिताना अक्षरापुढे पूर्णविराम देणे आवश्यक आहे.
पुढील वस्तू आणा साखर चहा पावडर दूध.पुढील वस्तू आणा : साखर, चहा पावडर, दूध.अपूर्णविराम (:): वाक्याच्या शेवटी तपशील किंवा यादी द्यायची असल्यास अपूर्णविराम वापरतात.
प्रेम विवाह ही आजकाल सामान्य गोष्ट आहे.प्रेम-विवाह ही आजकाल सामान्य गोष्ट आहे.संयोगचिन्ह (-): दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास हे चिन्ह वापरतात.
या तक्त्यावरून तुम्हाला विरामचिन्हांचे महत्त्व लक्षात आले असेल.

2 thoughts on “विरामचिन्ह”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top