शब्दसिद्धी.

शब्दसिद्धी म्हणजेच शब्द कसा झाला ती सिद्ध करण्याची पद्धत म्हणजे शब्द होय .

 

१ ) तद्भव शब्द संस्कृत भाषेतून मराठीत येताना त्या शब्दाच्या मूळ रूपात बदल होतो त्यास तद्भव असे म्हणतात .

उदा घर, गृह, कोळा, कोमल, सासू, काम, कर्मघास, ग्रास, भाऊ, राहतो पाय पद सासरा ससुर इत्यादी.

 

२ ) तत्सम शब्द जे संस्कृत शब्द मराठी भाषेत काही फरक न होता तसेच्या  तसे मराठी मध्ये आले आहेत त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात .

उदाभगवान, मस्त, कर, ग्रंथ, कर, कन्या, उत्सव, अरण्य, नदी, चल,

 

) देशी शब्द पुढील प्रमाणे_ झाड चिमणी दगड धोंडा बोका रेडा घोडा बाजरीपीठ खुळा ढेकूण इत्यादी

 

४ ) गुजराती शब्द पुढील प्रमाणे_ शेठ मथळा, ढोकळा रिकामटेकडा डब्बा इजा घे दादर बदला सदरा इत्यादी

 

५ ) अरबी शब्द पैज जाहीर जामीन उर्फ शहर मेहनत मुलामा मोजतात नक्कल इनाम खर्च मजबूत अर्ज जबाब इत्यादी

 

६ ) फारशी शब्द पेशवा हकीकत सरकार जहांगीर गरीब महिला मेना पोशाख शाही समता हजार अब्रूषणाई दाऊत इत्यादी

 

७ ) कानडी शब्द चिरगुट अक्का पडवळ अण्णा शिकेकाई भांडे अडकित्ता खलबत्ता लवंगी वेळी चाकरी ताई गुढी इत्यादी.

 

८ ) पोर्तुगीज शब्द तुरुंग, बटाटा, बटवा, तंबाखू, जागरी, फॅमिली, तिजोरी, पोर.

 

Ø  साधितशब्द साधितशब्दांच्या मागे उपसर्ग किंवा पुढे प्रत्यय लावून जे शब्द तयार होतात त्यांना साथ शब्द असे म्हणतात

उदाहरणार्थ – कर पासून करिता, करीन, करणारा, इत्यादि

 

Ø  उपसर्गघटित शब्द शब्दांच्या पूर्वी जी अक्षरे सो जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात अशा तयार होणाऱ्या शब्दाला उपसर्ग घटित शब्द म्हणतात उदाउपहार, अतिक्रमण, अवगुण, अत्यंत,

 

Ø  प्रत्ययघटित शब्द शब्दानंतर लागलेल्या अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात व त्यापासून बनलेल्या शब्दाला प्रत्येक घटित शब्द असे म्हणतात उदाहरणार्थ जडत्व, तोफखाना, नवलाई, औरंगाबाद,

 

Ø   पूर्णाभ्यस्तएक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा पुन्हा येऊन एक जोडशब्द बनतो त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात .

        उदाहरणार्थ वटवट हळहळ खळखळ, हळूहळू, सरसर पाढेच पाढे, वरचेवर, लांबच लांब,

 

Ø  अंशाभ्यस्त एक पूर्ण शब्द जशा तसा पुन्हा न येत आहे एखादी अक्षर बदलून येतो त्यास अंशाभ्यस्त असे म्हणतात .         

       उदाहरणार्थ शेजारी पाजारी गोडधोड झाडबीड,

 

Ø अनुकरणवाचक यात दोन्ही वाचक शब्दाची पुनरावृत्ती झालेली असते

                               उदाहरणं किरकिर चिव चिव काव काव फडफड सळसळ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top