वाक्यांचे प्रकार.

मराठी व्याकरणामध्ये वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दांचा समूह होय. वाक्याचे मुख्य दोन आधारानुसार वर्गीकरण केले जाते.
 
प्रस्तावना आणि स्पष्टीकरण
वाक्याचा अर्थ काय निघतो आणि वाक्याची रचना कशी आहे यावर त्याचे प्रकार अवलंबून असतात. आपण बोलताना कधी प्रश्न विचारतो, कधी आज्ञा देतो तर कधी केवळ माहिती देतो. यावरूनच वाक्यांचे विविध प्रकार ठरतात.
 

 
१. वाक्याच्या अर्थावरून पडणारे प्रका
हे प्रकार वाक्यातून व्यक्त होणाऱ्या भावनेवरून किंवा अर्थावरून ओळखले जातात.
 
प्रकारकसे ओळखावे ?उदाहरण
विधानार्थीकेवळ माहिती किंवा विधान असते. शेवटी पूर्णविराम असतो.माझे वडील शेतकरी आहेत.
प्रश्नार्थीकाहीतरी विचारलेले असते. शेवटी प्रश्नचिन्ह असते.तू कधी येणार आहेस?
उद्गारार्थीमनातील भावना तीव्रपणे व्यक्त होतात. उद्गारचिन्ह असते.बापरे! केवढी ही गर्दी!
आज्ञार्थीआज्ञा, हुकूम, विनंती किंवा उपदेश असतो.खिडकी बंद कर.
होकारार्थीवाक्यात ‘नाही’, ‘नको’ असे शब्द नसतात (करणरूपी).तो नेहमी खरे बोलतो.
नकारार्थीवाक्यात नकार (न, नाही, नको) असतो.मला चहा आवडत नाही.
 
 
२. वाक्याच्या रचनेवरून पडणारे प्रकार 
हे प्रकार वाक्यात किती क्रियापदे आहेत आणि वाक्ये कशी जोडली आहेत यावर ठरतात.
 
उपप्रकारकसे ओळखावे ?उदाहरण
केवळ वाक्ययात एकच उद्देश (कर्ता) आणि एकच विधेय (क्रियापद) असते.मुले मैदानावर खेळतात.
संयुक्त वाक्यदोन स्वतंत्र वाक्ये ‘आणि, व, पण, किंवा’ या अव्ययांनी जोडलेली असतात.सायंकाळ झाली आणि पक्षी घरट्यात परतले.
मिश्र वाक्यएक मुख्य वाक्य व दुसरे गौण वाक्य ‘जर-तर, जेव्हा-तेव्हा’ ने जोडलेले असते.जर पाऊस पडला, तर पीक चांगले येईल.
 

 
काही विशेष उपप्रकार (क्रियापदाच्या अर्थावरून)
 
उपप्रकारओळखउदाहरण
स्वार्थीक्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो.मुलाने अभ्यास केला.
विध्यर्थीकर्तव्य, शक्यता, योग्यता किंवा तर्क (शेवटी ‘वा, वी, वे’ येते).मुलांनी आई-वडिलांची आज्ञा पाळावी.
संकेतार्थीअट किंवा अट दर्शवणारा संकेत असतो.तू आलास, तर आपण फिरायला जाऊ.
मराठी व्याकरणातील वाक्यांचे प्रकार अचूक ओळखण्यासाठी काही ‘स्मार्ट टिप्स’ 
 
१. अर्थावरून वाक्य ओळखण्याच्या टिप्स
  • विधानार्थी: वाक्याच्या शेवटी साधा पूर्णविराम असतो आणि वाक्य एकदम साधे असते. (उदा. तो घरी गेला.)
  • प्रश्नार्थी: वाक्यात प्रश्नार्थक शब्द (का, कधी, कुठे, कोणाचे) असतात आणि शेवटी ‘?’ चिन्ह असते.
  • उद्गारार्थी: वाक्याची सुरुवात अनेकदा ‘किती’, ‘काय’, ‘अबब’, ‘अरेरे’ ने होते आणि शेवटी ‘!’ चिन्ह असते.
  • आज्ञार्थी: क्रियापदाचे रूप आज्ञा देणारे असते (कर, जा, बसा, लिहा). लक्षात ठेवा, प्रार्थना (देवा, मला बुद्धी दे) सुद्धा आज्ञार्थीच असते.
  • होकारार्थी vs नकारार्थी: वाक्यात ‘न’, ‘नाही’, ‘नको’, ‘नये’ हे शब्द दिसले की ते नकारार्थी असते.
 
२. रचनेवरून वाक्य ओळखण्याच्या सोप्या ट्रिक्स
  • केवळ वाक्य (Simple Sentence): वाक्यात एकच क्रियापद असेल, तर डोळे मिटून ते ‘केवळ वाक्य’ समजावे.
  • संयुक्त वाक्य (Compound Sentence): यात दोन स्वतंत्र वाक्ये आणि, व, शिवाय, अथवा, किंवा, पण, परंतु या शब्दांनी जोडलेली असतात.
    • ट्रिक: यातील दोन्ही वाक्ये स्वतंत्रपणे अर्थ देऊ शकतात. (उदा. पाऊस पडला आणि मोर नाचू लागला.)
  • मिश्र वाक्य (Complex Sentence): यात जो-तो, जेव्हा-तेव्हा, जर-तर, कारण, म्हणून (उद्देशासाठी) या शब्दांचा वापर होतो.
    • ट्रिक: यात एक वाक्य दुसऱ्यावर अवलंबून असते. पहिले वाक्य वाचले की मनात “पुढे काय?” असा प्रश्न येतो.
 
३. क्रियापदाच्या अर्थावरून ओळख (विशेष उपप्रकार)
  • विध्यर्थी: क्रियापदाच्या शेवटी वा, वी, वे, व्या असे प्रत्यय असतात. (उदा. मुलांनी अभ्यास करावा.
  • संकेतार्थी: वाक्यात ‘अट’ असते. सुरुवात ‘जर’ ने किंवा क्रियापदाला ‘स’ प्रत्यय लागतो. (उदा. पाऊस पडला तर हवा गार होईल.)
४. परीक्षेत वेळ वाचवण्यासाठी तक्ता
 
शब्दाची हिंट वाक्याचा प्रकार
! (चिन्ह)उद्गारार्थी
? (चिन्ह)प्रश्नार्थी
आणि, व, पण, परंतुसंयुक्त वाक्य
जर-तर, जेव्हा-तेव्हा, म्हणून (कारण)मिश्र वाक्य
वा, वी, वे (क्रियापदाला)विध्यर्थी
येथे वाक्यांचे विविध प्रकार आणि त्यांची उदाहरणे ३ कॉलममध्ये दिली आहेत जेणेकरून तुम्हाला सराव करणे सोपे जाईल आणि माहीत होईल कोणत्या प्रकारात कसे वाक्य असतात. 
हे सर्व उदाहरणे मागील परीक्षेत आलेले आहेत त्यामुळे बारकाइने अभ्यासा. 
 
क्रमांकउदाहरणवाक्याचा प्रकार
मुलांनो, शिस्तीने चाला.आज्ञार्थी वाक्य
केवढा मोठा हा हत्ती!उद्गारार्थी वाक्य
तू कधी परत येणार आहेस?प्रश्नार्थी वाक्य
भारत माझा देश आहे.विधानार्थी वाक्य
मला खोटे बोललेले आवडत नाही.नकारार्थी वाक्य
त्याने अभ्यास केला आणि तो खेळायला गेला.संयुक्त वाक्य
जर पाऊस पडला, तर पीक चांगले येईल.मिश्र वाक्य
सायंकाळी मुले मैदानावर खेळतात.केवळ वाक्य
खिडकी बंद कर.आज्ञार्थी वाक्य
१०आई, मला भूक लागली आहे.होकारार्थी वाक्य
११तू परीक्षेत पास झालास का?प्रश्नार्थी वाक्य
१२अबब! काय हे अफाट जल !उद्गारार्थी वाक्य
१३मुलांनी दररोज अभ्यास करावा.विध्यर्थी वाक्य
१४आकाशात ढग जमले आणि पाऊस पडू लागला.संयुक्त वाक्य
१५जो कष्ट करतो, तोच यशस्वी होतो.मिश्र वाक्य
१६देवाने सर्वांचे भले करावे.प्रार्थना (आज्ञार्थी)
१७मला चहा नको आहे.नकारार्थी वाक्य
१८आम्ही बागेत गेलो, पण फुले तोडली नाहीत.संयुक्त वाक्य
१९जेव्हा सूर्य उगवतो, तेव्हा प्रकाश पडतो.मिश्र वाक्य
२०झाडाची पाने हिरवी आहेत.विधानार्थी वाक्य
२१खोटे बोलणे हा गुन्हा आहे.विधानार्थी वाक्य
२२कृपया मला पेन देशील का?विनंती (आज्ञार्थी/प्रश्नार्थी)
२३तो कधीच शाळेत उशिरा येत नाही.नकारार्थी वाक्य
२४शाब्बास! तू छान काम केलेस.उद्गारार्थी वाक्य
२५पाऊस पडला, म्हणून मोर नाचू लागला.मिश्र वाक्य
२६कष्टाशिवाय फळ मिळत नाही.नकारार्थी वाक्य
२७तो अभ्यास करतो की खेळतो?प्रश्नार्थी वाक्य
२८गुरुजींनी मुलांना गोष्ट सांगितली.केवळ वाक्य
२९तो आला आणि मी गेलो.संयुक्त वाक्य
३०जर तू आलास, तर आपण फिरायला जाऊ.संकेतार्थी वाक्य
३१खोटं बोलू नका.आज्ञार्थी वाक्य
३२मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी आहे.विधानार्थी वाक्य
३३किती सुंदर आहे हे फूल!उद्गारार्थी वाक्य
३४तू जेवण केलेस का?प्रश्नार्थी वाक्य
३५सूर्य मावळला आणि अंधार पडला.संयुक्त वाक्य
३६ज्याच्या हाती ससा, तो पारधी.मिश्र वाक्य
३७मला अभ्यास करायला खूप आवडते.होकारार्थी वाक्य
३८पाऊसाने दडी मारली, परंतु शेतकरी खचला नाही.संयुक्त वाक्य
३९आजीने आम्हांला गोष्ट सांगितली.केवळ वाक्य
४०दरवाजा उघड.आज्ञार्थी वाक्य
४१बापरे! काय भयानक अपघात हा!उद्गारार्थी वाक्य
४२तुझे घर कोठे आहे?प्रश्नार्थी वाक्य
४३मी नक्की पास होईल.होकारार्थी वाक्य
४४पाऊस थांबला की आपण बाहेर पडू.मिश्र वाक्य
४५त्याने पत्र वाचले आणि तो हसू लागला.संयुक्त वाक्य
४६पक्षी झाडावर घरटे बांधतात.केवळ वाक्य
४७कोणालाही त्रास देऊ नका.आज्ञार्थी वाक्य
४८वा! काय गोड गाणे आहे!उद्गारार्थी वाक्य
४९चहा घेणार की कॉफी?प्रश्नार्थी वाक्य
५०त्याने आता गावाला जावे.विध्यर्थी वाक्य

9 thoughts on “वाक्यांचे प्रकार”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top