काळ

सर्वात महत्त्वाचे काम वाक्यामध्ये क्रियापद करते. आपल्याला वाक्याचा काळ क्रियापदामुळेच समजला जातो. काळाचे प्रमुख तीन प्रकार आहे. वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ 

काळ कसा ओळखायचा ?  वाक्यात क्रियापद एकटेच आले असेल तर तो कोणता ना कोणता साधा काळ असतो.

थोडक्यात पुढील प्रमाणे पाहू .

१. वर्तमानकाळ (Present Tense)
स्पष्टीकरण: जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता (सध्याच्या वेळी) घडते आहे असा बोध होतो, तेव्हा त्याला वर्तमानकाळ म्हणतात. यात क्रियेची सध्याची स्थिती समजते.
 
क्र.वर्तमानकाळातील उदाहरणे
मी रोज व्यायाम करतो.
गाय दूध देते.
मुले मैदानावर खेळतात.
आई स्वयंपाक करत आहे.
पक्षी आकाशात उडतात.
 

 
२. भूतकाळ (Past Tense)
स्पष्टीकरण: जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वीच घडून गेलेली आहे असा बोध होतो, तेव्हा त्याला भूतकाळ म्हणतात. ही क्रिया घडून काही वेळ किंवा दिवस उलटलेले असतात.
 
क्र.भूतकाळातील उदाहरणे
काल खूप पाऊस पडला.
रामने आंबा खाल्ला.
आम्ही परवा चित्रपट पाहिला.
तिने सुंदर गाणे गािले.
त्याने स्पर्धा जिंकली.
 

 
३. भविष्यकाळ (Future Tense)
स्पष्टीकरण: जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे (येणाऱ्या काळात) घडणार आहे असा बोध होतो, तेव्हा त्याला भविष्यकाळ म्हणतात. यात क्रिया अजून घडलेली नसते, ती नियोजित असते.
 
क्र.भविष्यकाळातील उदाहरणे
मी उद्या गावाला जाईन.
तू परीक्षेत नक्की यश मिळवशील.
आम्ही संध्याकाळी बागेत खेळू.
पाऊस पडल्यावर शेतकरी पेरा करेल.
तो मोठेपणी डॉक्टर होईल.

वरील काळाच्या तीन प्रकारावरून खालील काळाचे चार उपप्रकार पडतात ते पुढील प्रमाणे

काळाचा उपप्रकारवर्तमानकाळभूतकाळभविष्यकाळ
१. साधा (Simple)मी पत्र लिहितो.मी पत्र लिहिले.मी पत्र लिहीन.
२. अपूर्ण (Continuous)मी पत्र लिहित आहे.मी पत्र लिहित होतो.मी पत्र लिहित असेन.
३. पूर्ण (Perfect)माझे पत्र लिहून झाले आहे.माझे पत्र लिहून झाले होते.माझे पत्र लिहून झाले असेल.
४. रीती (Habitual)मी पत्र लिहित असतो.मी पत्र लिहित असे.मी पत्र लिहित जाईन.
लक्षात ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. 
  • साधा काळ: यात फक्त एकच क्रियापद असते.
  • अपूर्ण काळ: यात मुख्य क्रियापदाला ‘त’ प्रत्यय असतो आणि सोबतीला ‘आहे/होतो/असेन’ ही सहाय्यक क्रियापदे असतात.
  • पूर्ण काळ: यात क्रिया पूर्ण झालेली असते (उदा. खाल्ला आहे, गेला होता).
  • रीती काळ: यात क्रिया वारंवार घडण्याची किंवा ती एक सवय असल्याची रीत समजते.
काळ आणि त्यांची उदाहरणे
 
क्र.उदाहरणकाळाचा प्रकार
सूर्य पूर्वेला उगवतो.साधा वर्तमानकाळ
त्याने सुंदर कविता लिहिली.साधा भूतकाळ
मी उद्या गावाला जाईन.साधा भविष्यकाळ
आई स्वयंपाक करत आहे.अपूर्ण वर्तमानकाळ
मुले मैदानावर खेळत होती.अपूर्ण भूतकाळ
आम्ही सिनेमा पाहत असू.अपूर्ण भविष्यकाळ
माझे जेवण झाले आहे.पूर्ण वर्तमानकाळ
पाऊस पडून गेला होता.पूर्ण भूतकाळ
त्याने अभ्यास केला असेल.पूर्ण भविष्यकाळ
१०तो दररोज व्यायाम करत असतो.रीती वर्तमानकाळ
११आजी आम्हाला गोष्टी सांगत असे.रीती भूतकाळ
१२मी नेहमी खरे बोलत जाईन.रीती भविष्यकाळ
१३पक्षी आकाशात उडतात.साधा वर्तमानकाळ
१४काल खूप पाऊस पडला.साधा भूतकाळ
१५तू नक्कीच परीक्षेत पास होशील.साधा भविष्यकाळ
१६विद्यार्थी अभ्यास करत आहेत.अपूर्ण वर्तमानकाळ
१७तो रडत होता.अपूर्ण भूतकाळ
१८आम्ही उद्या फिरत असू.अपूर्ण भविष्यकाळ
१९गुरुजींनी धडा शिकवला आहे.पूर्ण वर्तमानकाळ
२०त्याने पत्र लिहिले होते.पूर्ण भूतकाळ
२१सायंकाळपर्यंत ते घरी पोहोचले असतील.पूर्ण भविष्यकाळ
२२शेतकरी कष्ट करत असतो.रीती वर्तमानकाळ
२३लहानपणी मी खूप खेळत असे.रीती भूतकाळ
२४तो नियमितपणे येत जाईल.रीती भविष्यकाळ
२५वारा सुटला आहे.पूर्ण वर्तमानकाळ
 

 
अभ्यासासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. 
  • त असतो / त असते: रीती वर्तमानकाळ.
  • त असे: रीती भूतकाळ.
  • त जाईल / त जाईन: रीती भविष्यकाळ.
  • त आहे / त होते: अपूर्ण काळ.
  • ला/ली/ले + आहे / होते: पूर्ण काळ.

1 thought on “काळ”

  1. Pingback: Tense and Types of Tense in Marathi 2024

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top