प्रयोग
भाषेचे प्रयोग व त्याचे प्रकार
वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या एकमेकांमधील परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात.”
प्रयोग वाक्याचे महत्वाचे घटक तीन आहेत. कर्ता, कर्म व क्रियापद, क्रिया करणारा कर्ता, ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म कर्ता व कर्म ह्यांचा क्रियापदाशी संबंध असतोच. हा संबंध कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग, वचन, पुरूष ह्या संदर्भात असतो. क्रियापदाचे कार्त्याशी किंवा कर्माशी येणारा संबंध म्हणजेच प्रयोग होय. मुख्य प्रयोग तीन आहेत :
१) कर्तरी प्रयोग २) कर्मणी प्रयोग ३) भावे प्रयोग .
१. कर्तरी प्रयोग : अ) कर्तरी प्रयोगात कर्त्याची विभक्ती प्रथमा असते
ब) कर्माची विभक्ती द्वितीया असते.
क) कर्त्याच्या लिंग, वचनाप्रमाणे क्रियापद बदलते.
कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार : अ) सकर्मक कर्तरी ब) अकर्मक कर्तरी
अ) सकर्मक कर्तरी प्रयोग *
कर्तरी प्रयोगात जर कर्म असेल तर तो सकर्मक कर्तरी प्रयोग होय.
कर्त्याच्या लिंग प्रमाणे क्रियापद बदलते.
उदा : 1. अनिल पुस्तक वाचतो. 2. संगीता पुस्तक वाचते..
कर्त्याच्या वचनाप्रमाणे क्रियापद बदलते. उदा:1. मुलगा चित्र काढतो. 2. मुले चित्र काढतात.
ब) अकर्मक कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोगात कर्म नसेल तर तो अकर्मक कर्तरी प्रयोग
उदा- 1. राणी हसते. 2. पार्वती झोपते. (कर्म नाही)
- कर्मणी प्रयोग : कर्माचे जे लिंग, वचन तेच लिंग, वचन क्रियापदाचे असते. अशा रचनेस कर्मणी प्रयोग म्हणतात. कर्म प्रथमात असते. कर्माप्रमाणे क्रियापद चालते. कर्त्याची विभक्ती तृतीया असते.
उदा :1. सतीशने पेरू खाल्ला. 2. संगीताने सफरचंद खाल्ले, 3. अजयने काकडी खाल्ली.
कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात.
- प्राचीन कर्मणी प्रयोग किंवा पुराण कर्मणी प्रयोग
- नवीन कर्मणी प्रयोग 3. समापन कर्मणी प्रयोग
- शक्य कर्मणी प्रयोग 5. प्रधान कर्ता कर्मणी प्रयोग
( note – सरळ सेवे मध्ये खोलवर विचारत नाहीत )
- प्राचीन कर्मणी प्रयोग किंवा पुराण कर्मणी प्रयोग : मराठी भाषेमध्ये आलेला हा प्रयोग मूळ संस्कृत कर्मणी प्रयोगापासून तयार झाला आहे तसेच या कर्मणी प्रयोगाच्या उदाहरणांमध्ये येणारी वाक्य हि संस्कृत मधील कवीरूपी आढळतात.
उदा : 1. नळे इंद्रास असे बोलीले.2. जो जो किजो परमार्थ लाहो.
- नवीन कर्मणी प्रयोग : नवीन कर्मणी प्रयोगामध्ये इंग्रजी भाषेमधील Passive Voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते. तसेच वाक्याच्या सुरवातीला कर्म येते व कर्त्या कडून त्याला प्रत्यय लागत असतात.
उदा : 1. रावण रामाकडून मारला गेला. 2. चोर पोलिसांकडून पकडला गेला.
- समापण कर्मणी प्रयोग : मराठी भाषेमध्ये जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास समापण कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा : 1. त्याचा पेरू खाऊन झाला. 2. रामाची गोष्ट सांगून झाली.
- शक्य कर्मणी प्रयोग : भाषेमध्ये कर्मणी प्रयोगातील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा होतो किंवा दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे संबोधले जाते.
उदा : 1. आई कडून काम करविते. 2. बाबांकडून जिना चढविता. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग :
- जेव्हा एखाद्या कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्ता हा प्रथम मानला जातो तेव्हा निर्माण होणाऱ्या प्रयोगास प्रधान कर्तु कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा : 1. त्याने काम केले. 2. तिने पत्र लिहिले.
3. भावे प्रयोग :
मराठी भाषेमध्ये जेव्हा वाक्यातील कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हटले जाते.
उदा: 1. रामने बैलाला पकडले. 2. सिताने मुलांना मारले.
भावे प्रयोगाचे तीन उपप्रकर पडतात.
- सकर्मक भावे प्रयोग 2. अकर्मक भावे प्रयोग 3. अकर्तुक भावे प्रयोग
अ) अकर्मक भावे प्रयोग : • ज्या भावे प्रयोगात कर्म नसते. तो अकर्मक भावे प्रयोग, त्याने उठावे. कर्ता तृतीयेत आहे. उदा : 1. शेतावर जाण्यास त्याला उजाडले. ‘त्याला’ हा कर्ता चतुर्थीत आहे.
ब) सकर्मक भावे प्रयोग : ज्या भावे प्रयोगात कर्म असते, त्यास सकर्मक भावेप्रयोग असे म्हणतात.
उदा :१) शिपायाने चोरास पकडले.
२) शिपायांनी चोरांना पकडले. क्रियापद ‘पकडले’ स्वतंत्र कर्म चोरास, चोरांना (द्वितीयेत).
क). अकर्तुक भावे प्रयोग :भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता आलेला नसेल तेव्हा त्यास अकर्तक भावे प्रयोग असे म्हणतात.
उदा :१) आता उजाडले. २) शांत बसावे. (३) आज सारखे उकडते.
प्रयोगांचे रूपांतरण करणे :
- कर्तरी प्रयोगाचे कर्मणी प्रयोगात रूपांतर
कर्तरी कर्मणी १) गाय गवत खाते. गाईने गवत खाल्ले. २) कुमार अभ्यास करतो. कुमारने अभ्यास केला.
- कर्मणी प्रयोगाचे कर्तरी प्रयोगात रूपांतर
कर्मणी कर्तरी १) सुमनने कविता लिहिली. – सुमन कविता लिहिते.
२) सुरेशने चित्र काढले. सुरेश चित्र काढतो..