शब्दांच्या जाती.

शब्दांचे असे आठ प्रकार आहेत त्यांनाच शब्दांच्या आठ जाती असे म्हणतात. बदल होणे याला व्याकरणात विकार असे म्हणतात. शब्दांच्या आठ जातींपैकी नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद ही चार विकारी आहेत म्हणजेच त्यांच्यात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होतो.क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी व केवलप्रयोगी ही चार अविकारी आहेत म्हणजेच त्यांच्यात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होत नाही

विकारी व अविकारी यांना अनुक्रमे सव्यय व अव्यय असे म्हणतात.  

१. नाम
  • टिप: कोणत्याही प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा काल्पनिक वस्तूला दिलेल्या नावाला ‘नाम’ म्हणतात.
  • उदाहरणे
 
व्यक्ती/प्राणीवस्तूगुण/भाव
राहुल, वाघ, मुलगीवही, दगड, अमृतप्रामाणिकपणा, गोडी, आनंद
 
२. सर्वनाम 
  • टिप: वाक्यात नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळण्यासाठी नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला ‘सर्वनाम’ म्हणतात.
  • उदाहरणे
मुख्य सर्वनामेउदाहरणे
प्रथम पुरुषीमीआम्ही
द्वितीय पुरुषीतूतुम्ही
तृतीय पुरुषीतो, ती, ते, त्या
इतरहा, जो, कोण, काय, आपण
 
३. विशेषण
  • टिप: नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगून त्या नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला ‘विशेषण’ म्हणतात.
  • उदाहरणे
 
गुण विशेषणसंख्या विशेषणपरिमाण विशेषण
हुशार मुलगादहा फुलेथोडे पाणी
ताजी फळेपाचवी इयत्ताभरपूर कष्ट
४. क्रियापद
  • टिप: वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला ‘क्रियापद’ म्हणतात. हे सहसा वाक्याच्या शेवटी येते.
  • उदाहरणे
 
सकर्मकअकर्मकसंयुक्त
राम आंबा खातो.तो जोरात पळाला.मुले खेळू लागली.
 

 
५. क्रियाविशेषण अव्यय
  • टिप: क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला ‘क्रियाविशेषण अव्यय’ म्हणतात. (क्रिया कुठे, कधी, कशी घडली?)
  • उदाहरणे
 
काळ (कधी?)स्थळ (कुठे?)रीत (कशी?)
दररोजनित्ययेथेखालीहळूझटपट
 
६. शब्दयोगी अव्यय
  • टिप: जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात आणि त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतात.
  • उदाहरणे
शब्दजोडलेले अव्ययपूर्ण शब्द
घरसमोरघरासमोर
झाडवरझाडावर
शाळाजवळशाळेजवळ
 
७. उभयान्वयी अव्यय 
  • टिप: दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्ये जोडणाऱ्या शब्दांना ‘उभयान्वयी अव्यय’ म्हणतात.
  • उदाहरणे
 
जोडणारे शब्दउदाहरण वाक्य
आणि, वराम आणि श्याम शाळेत गेले.
पण, परंतुपाऊस पडला पण थंडावा नाही.
कारणतो आला नाही कारण तो आजारी होता.
 
८. केवलप्रयोगी अव्यय
  • टिप: आपल्या मनातील आनंद, आश्चर्य, दुःख यांसारख्या भावना व्यक्त करणाऱ्या उद्गारवाचक शब्दांना ‘केवलप्रयोगी अव्यय’ म्हणतात.
  • उदाहरणे
 
भावनाकेवलप्रयोगी शब्द
आश्चर्यअबब!अरेच्या!
प्रशंसाशाब्बास!वा!
दुःखअरेरे!आई गं!
परत एकदा रिवीयजन करू 
 
१. विकारी शब्द (सव्यय) – ज्यांच्या रूपात बदल होतो
 
जातीचे नावथोडक्यात अर्थउदाहरण
नाम व्यक्ती, वस्तू किंवा स्थळाचे नावमुलगा, शाळा, साखर
सर्वनाम नामाऐवजी येणारा शब्दमी, तू, तो, हा, कोण
विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्दहुशार, गोड, उंच
क्रियापदवाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्दखातो, पळाला, आहे
 
२. अविकारी शब्द (अव्यय) – ज्यांच्या रूपात बदल होत नाही
 
जातीचे नावथोडक्यात अर्थउदाहरण
क्रियाविशेषण अव्ययक्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्दहळू, काल, तिथे
शब्दयोगी अव्ययनामाला जोडून येणारा शब्दझाडावर, घरासमोर
उभयान्वयी अव्यय दोन शब्द किंवा वाक्ये जोडणारा शब्दआणि, व, पण, परंतु
केवलप्रयोगी अव्ययमनातील भावना व्यक्त करणारा शब्दअबब!, अरेरे!, शाब्बास!
येथे शब्दांच्या ८ जातींची एकत्रित ३० मिश्र उदाहरणे दिली आहेत जेणेकरून तुम्हाला सराव करणे सोपे जाईल आणि वर्गीकरण लक्ष्यात येईल. 
 
क्र.शब्दशब्दाची जात
सह्याद्रीनाम (विशेषनाम)
आम्हीसर्वनाम
कडूविशेषण
लिहितोक्रियापद
सावकाशक्रियाविशेषण अव्यय
टेबलाखालीशब्दयोगी अव्यय
अथवाउभयान्वयी अव्यय
छी!केवलप्रयोगी अव्यय
प्रामाणिकपणानाम (भाववाचक नाम)
१०स्वतःसर्वनाम
११ताजीविशेषण
१२बघितलेक्रियापद
१३उद्याक्रियाविशेषण अव्यय
१४शाळेजवळशब्दयोगी अव्यय
१५किंवाउभयान्वयी अव्यय
१६बापरे!केवलप्रयोगी अव्यय
१७नदीनाम (सामान्यनाम)
१८कोणसर्वनाम (प्रश्नार्थक)
१९दुप्पटविशेषण (संख्यावाचक)
२०धावतोक्रियापद
२१सततक्रियाविशेषण अव्यय
२२मित्रासहशब्दयोगी अव्यय
२३म्हणूनउभयान्वयी अव्यय
२४शी!केवलप्रयोगी अव्यय
२५धैर्यनाम (भाववाचक नाम)
२६जोसर्वनाम (संबंधी)
२७निळाविशेषण (गुणवाचक)
२८होताक्रियापद (सहायी)
२९तिथेक्रियाविशेषण अव्यय
३०परंतुउभयान्वयी अव्यय

8 thoughts on “शब्दांच्या जाती”

    1. मणापासून धन्यवाद सतयजित… साईट वर अजून बरीच माहिती आणि सराव पेपर आहेत त्याचा देखील उपयोग करून घ्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top