भाषा / प्राथमिक
भाषा म्हणजे, भावना विचार कल्पना व अनुभव व्यक्त करण्याचे साधन होय .
भाषा मुख्यतः दोन प्रकारची आहे.
१. स्वाभाविक / नैसर्गिक
२. कृत्रिम / सांकेतिक
मनुष्यप्राण्याची म्हणजेच आपली बोलण्याची भाषा किंवा हावभावाची भाषा ही नैसर्गिक भाषा म्हणून ओळखल्या जाते. ‘भाषा’ हा शब्द ‘भाष’ या संस्कृत धातूपासून आला असून त्याचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा आहे.
लिहिण्यासाठी आपण लिपी वापरतो. लिपीचा शोध लागल्यामुळे लेखन शक्य झाले आहे. भाषा हे एक संवादाचे प्रभावी माध्यम आहे. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय.
आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे मातृभाषा होय. मराठी आपली मातृभाषा आहे.
संस्कृत भाषा ही मराठीची जननी होय. मराठी भाषेतील पहिला शिलालेख कर्नाटकातील श्रवणबेळगोल येथील श्रीगोमटेश्वराच्या मूर्तीखाली आढळतो. ‘श्री चामुण्डराये करवियले’ ही शिलालेखातील ओळ म्हणजे मराठीतील पहिले उपलब्ध वाक्य होय. इसवी सन ९८३ च्या सुमारास हे वाक्य तिथे कोरले गेले असावे.
विवेकसिंधू हा ग्रंथ लिहिणारे आद्यकवी मुकुंदराज, श्री ज्ञानदेवी आणि अमृतानुभव हे अलोकिक ग्रंथ लिहिणारे श्री ज्ञानदेव यांनी मराठी भाषा संपन्न केली. ‘लीळाचरित्र’ हा आद्यगद्यग्रंथ लिहिणारे म्हाइट मराठीतील प्रारंभीच्या काळातील प्रसिद्ध ग्रंथकार होत…
महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे. २७ फेब्रुवारी हा जेष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस.
विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.
आपण जी लिपी वापरतो, तिचे नाव देवनागरी लिपी आहे. बाळबोध लिपी असेही तिला म्हणतात. आपली हि देवनागरी लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर अशा रेषांनी बनलेली
आहे. लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडे तिचे लेखन होते. शब्द लिहून झाल्यावर त्यावर शिरोरेघा देण्याची पद्धत आहे.
ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने म्हणजे वर्णाने दाखविला जातो व कोणत्याची वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात, ती आदर्श लिपी देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहेत, मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ती राजभाषा नसे असे माधव जुलियन यांनी म्हटले आहे.
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी असे सुरेश भट म्हणतात.
देवनागरी लिपीत मराठी, हिंदी, संस्कृत भाषांचे लेखन आपण करू शकतो.
तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूळ ध्वनीना वर्ण म्हटले जाते. मराठीमध्ये (४८) वर्ण आहेत. त्यांचे तीन प्रकार पडतात.
१२ स्वर स्वरादी ०२ व्यंजने ३४ ( नवीन पकडले तर 50 ठरतात )
तोंडावाटे बाहेर पडणाारे ध्वनी नष्ट होऊ नयेतं म्हणून त्यांना जी चिन्हे दिली जातात, त्यांना अक्षरे असे म्हणतात. ध्वनींच्या किंवा अक्षराच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द असे म्हटले जाते. शब्दांच्या अनुक्रम रचनेला रूढीने किंवा परंपरेने जर काही अर्थ प्राप्त होत असेल तर, त्यास वाक्य असे म्हणतात.
भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन होय. भाषांचे स्पष्टीकरण देणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हटले जाते.
मराठीत व्याकरणाचे पहिले पुस्तक विल्यम केरे यांनी सन १८०५ मध्ये लिहिले. त्या पुस्तकाचे नाव ‘द ग्रामर ऑफ मराठी लॅग्वेज’ असे ठेवण्यात आले.