संधी.
जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकात मिसळून त्या दोन्हीचां एक वर्ण तयार होतो त्या “संधी” असे म्हणतात .
संधीचे तीन मुख्य प्रकार पडतात
1. स्वरसंधी 2. व्यंजन संधी 3. विसर्गसंधी .
1. स्वरसंधी – दोन स्वर एकमेकाजवळ आले की ते दोन स्वर एकत्र येऊन त्यांचा एक स्वर बनतो त्याच स्वरसंधी असे म्हणतात
पोटशब्द जोडशब्द | पोटशब्द जोडशब्द |
देवालय देव + आलय महिंद्र मही + इंद्र विद्यार्थी विद्य + अर्थी | महर्षि महा +ऋषि महीश मही + ईश इत्यादी इती + आदी |
2.व्यंजन संधी– व्यंजन संधी जवळजवळ येणाऱ्या वर्णन पैकी दोन्ही वर्ण व्यंजने किंवा दुसऱ्या वर्ण स्वर असल्यास त्यास व्यंजन संधी असे म्हणतात .
जोडशब्द पोटशब्द | जोडशब्द पोटशब्द |
वाक्पती वाग् + पती विपतकाल विपद + काल षटशास्त्र षड् + शास्त्र वाङ्मय वाक् + मय | सज्जन सत् + जन चिदानंद चित् + आनंद जगन्नाथ जगत् + नाथ सदाचार सत् + आचार
|
3.विसर्गसंधी – एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिले वर्ण विसर्ग व दुसरी वर्ण
स्वर किंवा व्यंजन असल्यास होणाऱ्या संधीला विसर्गसंधी असे म्हणतात.
जोडशब्द
पोटशब्द |
जोडशब्द
पोटशब्द |
रज:कण – रज:+ कण
अध:पात – अध:+ पात
अंत:पटल – अंत:+ पटल
तेज:पुंज – तेज:+पुंज |
निरंतर
– नि:+अंतर
दुर्जन
– दु:+जन
बहिरंग
– बहि:+अंग
बहिद्वार – बहि:+द्वार |