समास
मराठी व्याकरणामधी दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दामधील विभक्ती प्रत्यय अथवा संबंध दर्शक शब्द गाळून त्या पासून जो एक संयुक्त शब्द बनविला जातो त्या पद्धतीस ‘समास’ असे म्हणतात आणि अशा प्रकारे या झालेल्या संयुक्त शब्दास मराठी व्याकरणात सामासिक शब्द म्हणतात.
उदा : 1. राजाचा वाडा – “राजवाडा” हा सामासिक शब्द •
मराठी व्याकरणात समाजाचे एकूण चार प्रकार आहेत
१) अव्ययीभाव समास – पहिले पद महत्वाचे
२) तत्पुरुष समास – दुसरे पद महत्वाचे
३) इंद्व समास – दोन्ही पदे महत्वाची
४) बहुव्रीहि समास – दोन्ही पदे गौण ( तिसऱ्याच पदाचा बोध होतो )
१) अव्ययीभाव समास – या समासात पहिले पद महत्वाचे असते .
दरसाल प्रत्येक साली हरघडी प्रत्येक घडीला
यथाशास्त्र शास्त्राप्रमाणे यथायोग्य योग्य असे. दिवसेंदिवस प्रत्येक दिवशी
क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला
२) तत्पुरुष समास –
दुसरे पद महत्वाचे म्हणजेच ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेल्या शब्द, विभक्तीप्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.थोडक्यात ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.
उदा : १) महामानव – महान असलेला मानव
२) राजपुत्र – राजाचा पुत्र
३) तोंडपाठ – तोंडाने पाठ
४) गायरान – गाईसाठी रान
५) वनभोजन – वनातील भोजन
तत्पुरुष समासाचे काही उपप्रकार पुढीलप्रमाणे –
१ -विभक्ती तत्पुरुष समास
मराठी व्याकरणानुसार ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पद जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. विभक्ती तत्पुरुष समासाची काही उदाहरणे :
२- अलक् तत्पुरुष समास – उदा – तोंडी लावणे हे अकच उदाहरण आहे .
३- उपपद तत्पुरुष समास
जेव्हा तपुरुष समासातील दुसरे पद-ज्याचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग होत नाही, अशा प्रकारचे – कृदंत – असते. तेव्हा त्यास उपपद तत्पुरुष समास म्हणतात.
सर्वज्ञ सर्व जाणणारा उपपद तत्पुरुष समास
जलद जल देणारा उपपद तत्पुरुष समास
गृहस्थ गृहात राहणारा उपपद तत्पुरुष समास
४- नत्र तत्पुरूष समास ज्या तत्पुरुश समासातील पहिले पद नकारार्थी असते त्यास तत्पूरूष समास असे म्हणतात उदा – अयोग्य – योग्य नाही नापसंत – पसंत नाही निरोगी – रोग नसलेला .
५- कर्मधारण्य समास : ज्या तत्पूरुष समसातील दोन्ही पदे अकाच विभकतीमध्ये म्हंजे प्रथमा विभक्ती मध्ये असतात तेव्हा त्यास कर्मधारन्य समास असे म्हणतात .
उदाहरणार्थ . मुखमल मुख हेच कमल पितांबर पिवळे असे वस्त्र महादेव महान असा देव रक्तचंदन रक्तासारखे चंदन महाराष्ट्र महान असे राष्ट्र .
द्विगु समास या सामासिक शब्दांचे पहिले पद संख्या विशेषण असते उदाहरणार्थ पंचवटी पाच वाट्यांचा समूह नवरात्र नवरात्रींचा समूह त्रिभुवन तीन भुवन यांचा समूह त्रिकोण तीन कोनांचा समूह सप्ताह सात दिवसांचा समूह
.
मध्यमपदलोपी समास ज्या सामासिक शब्दातील पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारी मधली पदे लोक करावी लागतात म्हणून त्यांना मध्यम बदलले समास म्हणतात
उदाहरण – साखरभात साखर घालून केलेला भात. डाळ वांगे वांगे युक्त डाळ कांदा पोहे कांदा घालून केलेले पोहे पुरणपोळी पुरण घालून केलेली पोळी .
.
3) द्वंद्व समास : – ज्या समासतील दोन्ही पदे प्रधान असतात त्यास द्वंद्व असे म्हणतात. यात समासाचा विग्रह करताना दोन पदांचा संबंध आणि, व,अथवा, किंवा’ अशा उभयान्वयी अव्ययानी स्पष्ट करावा लागतो.
उदाहरण :
१) मातापिता – माता आणि पिता
२) पापपुण्य – पाप अथवा पुण्य
३) कृष्णार्जुन – कृष्ण व अर्जुन
४) न्यायान्याय – न्याय किंवा अन्यास
द्वंद्व समासाचे तीन प्रकार आहेत
अ) इतरेतर द्वंद्व ब) वैकल्पिक द्वंद्व क) समाहार द्वंद्व
अ) इतरेतर द्वंद्व : ज्या समासातील पदांमध्ये “आणि, व, ‘ समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यये विग्रहाच्या वेळी घालावी लागतात.
उदाहरण :
1.) नवराबायको – नवरा व बायको
2.) यक्षकिन्नर – यक्ष आणि किन्नर
3.) सेवाशुश्रुषा – सेवा आणि शुश्रुषा
4.) कौरवपांडव – कौरव आणि पांडव
5.) उघडाबोडका – उघडा आणि बोडका
.
ब) वैकल्पिक द्वंद्व :– ह्या समासातील पदामध्ये विग्रहाच्या वेळी ‘अथवा, किंवा’ ह्यापैकी विकल्पबोधक उभयान्वयी अव्यये घालावी लागतात. अर्थाच्या दृष्टीने समासातील दोन्ही प्रधान पदापैकी एकाचीच मात्र अपेक्षा असते.
उदाहरण :
- खरेखोटे – खरे किंवा खोटे
- जयपराजय – जय किंवा पराजय
- पासनापास – पास किंवा नापास
- सारासार – सार किंवा असार
- मानापमान – मान किंवा अपमान
.
क) समाहार द्वंद्व :- ह्यात समासयुक्त पदांच्या अर्थाशिवाय आणखी तशाच प्रकारच्या अधिक गोष्टीचाही अंतर्भाव होतो.
उदाहरण :
- चहापाणी – चहा, पाणी व फराळाचे पदार्थ
- भाजीपाला – भाजी, पाला असेच पदार्थ
- मिठ भाकर – मीठ आणि भाकर .
.
४) बहुव्रीहि समास –
या समासात समासातील दोन्ही पदापैकी कोणतेही पद महत्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्या समासाला बहुविही समास असे म्हणतात.
उदाहरण :
- दशानन – दश आहेत आणणे ज्याला तो – रावण
- लंबोदर – लंब म्हणजे मोठे आहे उदर ज्याचे तो – गणपती
- अनंत – नाही अंत ज्याला तो
sverma45751@gmail.com
Question set pepar