सामान्य रूप.
विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या
स्वरूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात नामाला किंवा सर्वनामाला
उपस्थित किंवा शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी याचे रूप होते त्याला सामान्य रूप असे
म्हणतात .
थोडक्यात विभक्ती प्रत्यय किंवा त्याऐवजी येणारे शब्दयोगी
अव्यय जोडताना शब्दाचे मूळ रूप बदलते मूळ शब्दाची ही बदललेली स्थिती तिला सामान्य
रूप असे म्हणतात .
उदा |
मुळशब्द |
विभक्ती
प्रत्यय |
सामान्य रूप |
पायाला
सशयास
शाळेतून |
पाय
ससा
शाळा |
ला
स
ऊन |
पाया
सशया
शाळे |
सामान्यरूप कधी होत नाही ?
१. एकाक्षरी शब्दाचे सामान्यरूप होत नाही.
उदाहरणार्थ – अ ने ब ला मारले.
२. परकीय भाषेतील शब्दांचे सामान्यरूप कधी कधी होत नाही.
उदाहरणार्थ – शेक्सपिअरची नाटके अद्यापही लोकांना आवडतात.
३. ग्राम किंवा देशवाचक विशेषनामांचे सामान्यरूप कधी कधी होत नाही.
उदाहरणार्थ १. मी बनारसला शिक्षणासाठी गेलो.
२. ही वस्तू मी इंग्लंडहून आणली.
पण चतुर्थीचा स आणि सप्तमीचा त प्रत्यय लागताना सामान्यरूप
होते. जसे नागपूर नागपुरास, हिंदुस्थान – हिंदुस्थानात, पंजाब- पंजाबात
इत्यादी.
विशेषणांचे सामान्यरूप
Ø ‘अ‘कारांत, ‘ई‘ कारांत, व ‘ऊ‘ विशेषणांचे सामान्यरूप होत नाही.
१ जगात गरीब माणसाला कोणी विचारात नाही.
२. त्याचे लोकरी कपड्यांचे दुकान आहे.
३. मला कडू कारल्याची भाजी आवडते.
४. मला कडू कारल्याची भाजी आवडते.
Ø विभक्तीप्रत्यय लागलेल्या नामांच्या आकारांत विशेषणांचे सामान्यरूप ‘या‘ कारांत होते.
भल्या माणसाने, या मुलांचा, वेड्या मुलीने, खन्या गोष्टीस
उदा. १. चांगला माणूस – चांगल्या माणसास
२. हा कुत्रा – ह्या कुत्र्यास
सामान्य rup
मणापासून धन्यवाद पूजा मालीन … सरावासाठी सराव पेपर जास्तीत जास्त सोडवा.